Karan Johar: ‘त्या’ खास व्यक्तीसाठी क्रितीने ‘लस्ट स्टोरीज’मधील भूमिका नाकारली; करण जोहरचा खुलासा

अनुराग कश्यप, करण जोहर, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी यांनी चार कथा दिग्दर्शित केल्या होत्या. स्त्रियांच्या कामुक भावनेबद्दलच्या विविथ कथा यात आधुनिक दृष्टीकोनातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या होत्या.

Karan Johar: 'त्या' खास व्यक्तीसाठी क्रितीने 'लस्ट स्टोरीज'मधील भूमिका नाकारली; करण जोहरचा खुलासा
Karan Johar: 'त्या' खास व्यक्तीसाठी क्रितीने 'लस्ट स्टोरीज'मधील भूमिका नाकारलीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 9:04 AM

‘कॉफी विथ करण 7’चा (Koffee With Karan 7) आठवा एपिसोड गुरुवारी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला. या नव्या एपिसोडमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि शाहिद कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी कियारा आणि शाहिद यांनी त्यांच्या खासगी आयुष्यापासून ते बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. कियाराने 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात काम केलं होतं. चित्रपटातील कियाराच्या भूमिकेसाठी अभिनेत्री शोधणं खूप आव्हानात्मक असल्याचं करणने यावेळी म्हटलं. विशेष म्हणजे कियाराच्या आधी त्याने अभिनेत्री क्रिती सनॉनला त्या भूमिकेची ऑफर दिली होती. मात्र तिने ती नाकारली. ‘लस्ट स्टोरीज’मध्ये (Lust Stories) चार विविध दिग्दर्शकांच्या चार कथा दाखवण्यात आल्या होत्या. त्यातील एक कथा ही करण जोहरची होती, ज्यामध्ये कियारा आणि विकी कौशलने भूमिका साकारली होती.

अनुराग कश्यप, करण जोहर, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी यांनी चार कथा दिग्दर्शित केल्या होत्या. स्त्रियांच्या कामुक भावनेबद्दलच्या विविथ कथा यात आधुनिक दृष्टीकोनातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आल्या होत्या. “लस्ट स्टोरीजसाठी मी पहिली ऑफर क्रितीला दिली होती आणि तिने सांगितलं की तिची आई तशी भूमिका करण्याची परवानगी देत नव्हती. मला वाटलं क्रितीच्या आईप्रमाणेच इतरही विचार करू शकतात. कारण ती भूमिका तशी आव्हानात्मक होती. कियाराला मी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी भेटलो. तेव्हा मी तिला आलिया अडवाणी म्हणून ओळखायचो. माझ्या शॉर्ट फिल्मसाठी मी तिला भेटायला बोलावलं. तिने जेव्हा कथा ऐकली तेव्हा ती संभ्रमात पडली. तू स्वत: दिग्दर्शन करणार आहेस का, असा प्रश्न तिने मला विचारला. मी हो म्हणताच तिने भूमिकेसाठी होकार दिला”, असं करणने सांगितलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

फक्त करणसाठी ‘लस्ट स्टोरीज’मध्ये काम केल्याचं कियाराने सांगितलं. या भूमिकेमुळे कियाराने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. “लस्ट स्टोरीजमुळे अनेकांना माझ्याबद्दल समजलं, अनेकजण मला ओळखू लागले. पण जेव्हा मी चित्रपट साईन केला होता, तेव्हा मी फक्त करण जोहरसाठी होकार दिला होता. मला त्याच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती. आता जेव्हा मी त्या भूमिकेचा विचार करते, तेव्हा मला ती बोल्ड वाटत नाही. अशा विषयावर चित्रपट बनवणं खूप धाडसी होतं”, असं कियारा म्हणाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.