Kareena Kapoor: ‘सैफने लोकसंख्या वाढीसाठी आधीच भरपूर योगदान दिलंय’, प्रेग्नंसीच्या चर्चांवर करीनाचं उत्तर

करीना कपूर खान (Kareena Kapoor) ही तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना (pregnancy rumours) उधाण आलंय. या चर्चांमागचं कारण म्हणजे करीनाचा व्हायरल होत असलेला फोटो. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप सहज पहायला मिळत आहे.

Kareena Kapoor: 'सैफने लोकसंख्या वाढीसाठी आधीच भरपूर योगदान दिलंय', प्रेग्नंसीच्या चर्चांवर करीनाचं उत्तर
Kareena Kapoor KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 9:20 AM

अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor) ही तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना (pregnancy rumours) उधाण आलंय. या चर्चांमागचं कारण म्हणजे करीनाचा व्हायरल होत असलेला फोटो. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप सहज पहायला मिळत आहे. त्यामुळे तैमुर आणि जेहनंतर करीना तिसऱ्या बाळाला जन्म देण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला. या सर्व चर्चांनंतर आता खुद्द करीनाने उत्तर दिलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहित करीनाने प्रेग्नंसीच्या चर्चांवर उत्तर दिलं आहे. ‘पास्ता आणि वाईनमुळे माझं पोट फुगल्यासारखं वाटत होतं आणि सैफ (Saif Ali Khan) म्हणतोय की त्याने लोकसंख्या वाढीसाठी आधीच भरपूर योगदान दिलंय,’ अशी उपरोधिक पोस्ट लिहित तिने प्रेग्नंसीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

करीना गेल्या काही दिवसांपासून युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. पती सैफ अली खान आणि तैमुर, जेह या आपल्या दोन मुलांसोबत ती तिच्या ड्रिम व्हेकेशनवर असून त्याचे काही फोटोसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. मात्र या फॅमिली व्हेकेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. करीनाचा हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आणि काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं. यामागचं कारण म्हणजे फोटोमध्ये दिसणारा करीनाचा बेबी बंप. सैफ आणि करीना एका मित्राला भेटले असून त्याच्यासोबतचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप सहज पाहायला मिळत आहे. यावरून नेटकऱ्यांनी विविध अंदाज व्यक्त करण्यात सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

हाच तो फोटो-

करीनाचं स्पष्टीकरण-

‘पास्ता आणि वाईनमुळे पोट फुगलं होतं.. शांत राहा.. मी गरोदर नाही.. उफ्फ.. सैफ म्हणतोय त्याने आधीच लोकसंख्या वाढीसाठी खूप योगदान दिलंय. एंजॉय’, अशी पोस्ट करीनाने लिहिली. करीनाने ऑक्टोबर 2012 मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं. 2016 मध्ये तिने तैमुरला आणि 2021 मध्ये तिने जेहला जन्म दिला.

करीना लवकरच लाल सिंग चड्ढा या चित्रपटात झळकणार असून यामध्ये आमिर खानसोबत ती काम करताना दिसणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटाच्या कथानकावर आधारित आहे. दुसरीकडे सैफ आदिपुरुष आणि विक्रम वेधा या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणार आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.