VIDEO: कतरिना कैफ प्रेग्नंट आहे का? एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेता विकी कौशलशी (Vicky Kaushal) लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच हे दोघं सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी एका आयलँडवर फिरायला गेले होते. त्यानंतर कतरिनाला नुकतंच मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं.

VIDEO: कतरिना कैफ प्रेग्नंट आहे का? एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Katrina KaifImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 3:12 PM

अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेता विकी कौशलशी (Vicky Kaushal) लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच हे दोघं सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी एका आयलँडवर फिरायला गेले होते. त्यानंतर कतरिनाला नुकतंच मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट (pregnancy) आहे का, असा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारला. पिंक पेस्टल रंगाचा सूट आणि त्यावर दुपट्टा असा साधा लूक कतरिनाने केला होता. तिच्या या लूकवरूनही अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला. मात्र कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या कमेंट्समुळे सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

ती प्रेग्नंट आहे का, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला असता त्यावर दुसऱ्या युजरने उत्तर दिलं, ‘तिचा हा लूक पाहिल्यानंतर माझ्याही डोक्यात सर्वांत आधी हाच प्रश्न डोकावला’. ‘कतरिना प्रेग्नंट नसताना असे कपडे परिधान करू शकत नाही का’, असा सवाल एका युजरने त्यावर केला. तर तिच्या कपड्यांवरून नाही तर ज्याप्रकारे ती चालतेय, त्यावरून असा अंदाज लावल्याचं पहिल्या युजरने स्पष्ट केलं. कॅमेराचा चुकीचा अँगल आणि कतरिनाचं हळू चालणं यांमुळे नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट आहे का, असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. काहींनी तिला शुभेच्छाही देण्यास सुरुवात केली.

पहा व्हिडीओ-

जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कतरिना आणि विकीने गेल्या वर्षी लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत 9 डिसेंबर रोजी हा लग्नसोहळा पार पडला. सध्या कतरिना तिच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये सलमान खान आणि इम्रान हाश्मी यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय ती ‘जी ले जरा’ या चित्रपटातही मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्ये ती आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत काम करणार आहे.

हेही वाचा:

Dharmaveer: “जंगलात राहून वाघाशी, महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचा”; आनंद दीघेंवरील चित्रपटाचा दमदार टीझर

VIDEO: रणबीर-आलियाच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नये म्हणून सिक्युरिटी गार्डने उचललं हे पाऊल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.