Kim Sharma & Leander Paes: केक अन् किस.. किम शर्माने असा साजरा केला बॉयफ्रेंड लिएंडर पेसचा वाढदिवस

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. अखेर सप्टेंबर 2021 मध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर किमसोबतचे लिएंडरचे काही फोटो व्हायरल झाले होते.

Kim Sharma & Leander Paes: केक अन् किस.. किम शर्माने असा साजरा केला बॉयफ्रेंड लिएंडर पेसचा वाढदिवस
Kim Sharma, Leander Paes Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 4:31 PM

अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) आणि टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) यांचं अफेअर सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षापासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. मार्च महिन्यात दोघांच्या नात्याची वर्षपूर्ती झाली. आता लिएंडरच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त (birthday) किमने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. यातल्या काही फोटोंमध्ये लिएंडर किमच्या पालकांसोबतही पहायला मिळत आहे. ‘माझ्या सेक्सी, कूल, प्रेमळ, विनोदी, डिस्नेवर प्रेम करणाऱ्या, हँडसम जीवनसाथीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 49 वं वर्ष इतकं सुंदर कधीच वाटलं नव्हतं. आय लव्ह यू’, अशी पोस्ट किमने लिहिली आहे. बर्थडे सेलिब्रेशन आणि त्यानंतर लिएंडरला किस करतानाही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. अखेर सप्टेंबर 2021 मध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर किमसोबतचे लिएंडरचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याने आपल्या अकाऊंटवरही ते फोटो पोस्ट केले. किम आणि लिएंडर यांना अनेकदा डिनर डेटला, पार्टीला एकत्र जाताना पाहिलं गेलंय. दोघांनी एकमेकांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आहे. नुकतेच हे दोघं फ्लोरिडामधील वॉल्ट डिस्ने वर्ल्डला फिरायला गेले होते. तर जानेवारी महिन्यात किमचा वाढदिवस दोघांनी बहामासमध्ये साजरा केला.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

लिएंडर पेसचं 2017 मध्ये रिया पिल्लईशी लग्न झालं होतं. पण काही काळातच दोघं विभक्त झाले. त्याचवेळी अभिनेता हर्षवर्धन राणे याच्यासमवेत किमच्या अफेअरची चर्चा झाली होती. किम शर्माला ‘मोहब्बतें’ या चित्रपटामुळे ओळख मिळाली. यानंतर तिने ‘तुम से अच्छा कौन है’, ‘जिंदगी रॉक्स’, ‘मनी है तो हनी है’ अशा चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु तिला हवं तितकं यश मिळू शकलं नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.