AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Anushka: विराटच्या नैराश्याबद्दल KRK ची शेरेबाजी; नेटकरी भडकताच डिलिट केलं ट्विट

विराट-अनुष्का या लोकप्रिय जोडीबाबत अशी शेरेबाजी केल्याने नेटकऱ्यांनी फटकारल्यानंतर काही वेळाने केआरकेनं त्याचं हे ट्विट डिलिट केलं. केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो.

Virat Anushka: विराटच्या नैराश्याबद्दल KRK ची शेरेबाजी; नेटकरी भडकताच डिलिट केलं ट्विट
केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Aug 28, 2022 | 2:14 PM
Share

क्रिकेटर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नैराश्याला त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) कारणीभूत असल्याची टीका स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमाल आर खानने (KRK) केली. अनुष्कानेच विराटच्या डोक्यात ही गोष्ट आणली असेल की तो नैराश्यात आहे, कारण तो पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल अशी कबुली दिली, असं केआरके त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. विराट-अनुष्का या लोकप्रिय जोडीबाबत अशी शेरेबाजी केल्याने नेटकऱ्यांनी फटकारल्यानंतर काही वेळाने केआरकेनं त्याचं हे ट्विट डिलिट केलं. केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. यामुळे त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

केआरकेचं ट्विट-

‘विराट कोहली हा भारतातील पहिला क्रिकेटपटू आहे ज्याला डिप्रेशनची समस्या आहे. एका हिरोईनशी लग्न करण्याचा हा परिणाम आहे. नैराश्याची बाब अनुष्कानेच विराटच्या डोक्यात आणली असावी,’ असं ट्विट केआरकेनं केलं. ‘विराट कोहलीसारख्या एका उत्तर भारतीय स्ट्राँग मुलाला डिप्रेशनसारखा आजार कसा झाला’, असं म्हणत त्याने टीम इंडियातील त्याच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. या ट्विटवर सेलिब्रिटींसह सर्वसामान्य नेटकरीसुद्धा भडकले. ‘हा मूर्खपणा आहे’, असं अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने म्हटलं.

नैराश्याविषयी विराटचा खुलासा

विराटने नुकतंच स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मानसिक आरोग्याविषयी खुलासा केला. “मला हे मान्य करायला अजिबात लाज वाटत नाही की मी मानसिकदृष्ट्या खचलो होतो. हे वाटणं अगदी सामान्य गोष्ट आहे, परंतु आपण संकोच करत असल्यामुळे याबद्दल बोलत नाही. आम्ही मानसिकदृष्ट्या कमकुवत आहोत हे तुम्हाला बघायचं नसतं. पण माझ्यावर विश्वास ठेवा, स्ट्राँग आहोत असं खोटं दाखवणं हे दुर्बल असल्याचं कबूल करण्यापेक्षा खूप वाईट आहे”, असं विराट म्हणाला होता. आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताचं प्रतिनिधित्व करत असताना विराट रविवारी त्याचा 100 वा T20I सामना खेळणार आहे.

याआधीही अनुष्का झाली ट्रोल

विराटच्या फॉर्मसाठी अनुष्काला दोष देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. विराट जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर चांगली कामगिरी करू शकला नव्हता, तेव्हा अनेकदा अनुष्काला नेटकऱ्यांनी दोषी ठरवलं होतं. 2020 मध्ये एका सामन्याच्या कॉमेंट्रीदरम्यान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले होते, “यांनी लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या बॉलिंगची प्रॅक्टिस केली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.