Laal Singh Chaddha: ‘लाल सिंग चड्ढा’ देशात फ्लॉप तर परदेशात हिट; ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘द काश्मीर फाईल्स’पेक्षाही अधिक कमाई

गंगुबाई काठियावाडी, भुल भुलैय्या 2 आणि द काश्मीर फाईल्स हे तिन्ही चित्रपट देशभरात गाजले होते. कोरोना महामारीच्या आधी लाल सिंग चड्ढाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. जवळपास दोन वर्षे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होता.

Laal Singh Chaddha: 'लाल सिंग चड्ढा' देशात फ्लॉप तर परदेशात हिट; 'गंगुबाई काठियावाडी', 'द काश्मीर फाईल्स'पेक्षाही अधिक कमाई
Laal Singh ChaddhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 11:31 AM

आमिर खानचा (Aamir Khan) बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट कमाईच्या बाबतीत देशात जरी फ्लॉप ठरला असला तरी परदेशात या चित्रपटाने कमाईचा विक्रम मोडला आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, लाल सिंग चड्ढा हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर 2022 या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आंतरराष्ट्रीय कमाईच्या (International Collection) बाबतीत आमिरच्या या चित्रपटाने आलियाच्या गंगुबाई काठियावाडी, कार्तिक आर्यनच्या भुल भुलैय्या 2 आणि विवेक अग्निहोत्रींच्या द काश्मीर फाईल्सला मागे टाकलंय. जवळपास आठवडाभरात लाल सिंग चड्ढाने 7.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 59 कोटींचा गल्ला जमवला आहे.

भारताबाहेरील कमाई-

लाल सिंग चड्ढा- 7.5 दशलक्ष डॉलर्स गंगुबाई काठियावाडी- 7.47 दशलक्ष डॉलर्स भुल भुलैय्या 2- 5.88 दशलक्ष डॉलर्स द काश्मीर फाईल्स- 5.7 दशलक्ष डॉलर्स

गंगुबाई काठियावाडी, भुल भुलैय्या 2 आणि द काश्मीर फाईल्स हे तिन्ही चित्रपट देशभरात गाजले होते. कोरोना महामारीच्या आधी लाल सिंग चड्ढाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. जवळपास दोन वर्षे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होता. 180 कोटी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटातून आमिरने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलंय. फॉरेस्ट गम्प या हॉलिवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असून मराठमोळ्या अतुल कुलकर्णीने या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. लाल सिंग चड्ढाची जगभरातील कमाई सध्या 126 कोटी रुपये इतकी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मेला’ या चित्रपटानंतर आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सर्वांत मोठा फ्लॉप चित्रपट ठरल्याचं म्हटलं जात होतं. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.