Laal Singh Chaddha: प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘लाल सिंग चड्ढा’ ऑनलाइन लीक; आमिरला पायरसीचा फटका

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटावर बॉयकॉटची मागणी केली जात होती. त्यावरूनही आमिर चिंतेत होता. अशातच आता चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर प्रश्न उपस्थित होतोय.

Laal Singh Chaddha: प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'लाल सिंग चड्ढा' ऑनलाइन लीक; आमिरला पायरसीचा फटका
Laal Singh ChaddhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 3:58 PM

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आमिर खानचा (Aamir Khan) बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला. करीना कपूर आणि आमिरच्या चित्रपटाला पायरसीचा (Piracy) फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटावर बॉयकॉटची मागणी केली जात होती. त्यावरूनही आमिर चिंतेत होता. अशातच आता चित्रपट ऑनलाइन लीक झाल्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर प्रश्न उपस्थित होतोय. आमिरचा हा चित्रपट तमिळरॉकर्स, फिल्मीझिला, मूव्हीरुल्ज, टेलिग्राम यांसह इतर प्लॅटफॉर्म्सवर एचडी व्हर्जनमध्ये लीक झाला आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ चित्रपटात टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती.

आमिरच्या या चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. पहिल्या वीकेंडच्या कमाईवर या चित्रपटाचं यश अवलंबून असेल. आजच अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला आहे. रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, जन्माष्टमी यांच्या सुट्ट्या लागून असल्याने दोन्ही चित्रपटांना थिएटरमध्ये पुरेसा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

बुधवारी बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी लाल सिंग चड्ढाच्या स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, सुष्मिता सेन, सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल यांनी हजेरी लावली. हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याने त्याच्या कमाईला फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुर्दैवाने एखादा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याची ही पहिलीच वेळ नाही.

काही दिवसांपूर्वीच दलकर सलमानचा ‘सीता रामम’, आलिया भट्टचा ‘डार्लिंग्स’, तापसी पन्नूचा ‘शाब्बाश मिठ्ठू’, रणबीर कपूरचा ‘शमशेरा’, किच्चा सुदीपचा ‘विक्रांत रोना’, वरुण धवन आणि कियारा अडवाणीचा ‘जुग जुग जियो’ यांसारखे चित्रपट ऑनलाइन लीक झाले होते. RRR, केजीएफ 2, पुष्पा यांसारख्या दक्षिणेतल्या मोठ्या चित्रपटांनाही पायरसीचा फटका बसला होता.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.