Laal Singh Chaddha: आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ विरोधात जनहित याचिका दाखल; बंगालमध्ये चित्रपटावर पूर्ण बंदीची मागणी

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाविरोधात आता कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 23 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांच्यासमोर होणार आहे.

Laal Singh Chaddha: आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' विरोधात जनहित याचिका दाखल; बंगालमध्ये चित्रपटावर पूर्ण बंदीची मागणी
Laal Singh ChaddhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 12:00 PM

अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ट्विटरवरील बॉटकॉट ट्रेंडचा बळी ठरला आहे. कारण असंख्य नेटकऱ्यांनी प्रदर्शनापूर्वीच त्यावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली होती. बहिष्कारामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. आता याच दरम्यान आणखी एक बातमी समोर आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयात लाल सिंह चड्ढा या चित्रपटाविरोधात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत शांततेचा भंग झाल्याचं कारण देत बंगालमध्ये चित्रपटावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाविरोधात आता कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 23 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव यांच्यासमोर होणार आहे. या याचिकेत बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच चित्रपटावर बंदी न घातल्यास प्रत्येक सिनेमागृहाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणीही या चित्रपटाबाबत करण्यात आली आहे. या चित्रपटावर आरोप करण्यात आला आहे की, त्यात जे दाखवलं आहे त्याने बंगालमधील शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते. अधिवक्ता नाझिया इलाही खान यांनी या चित्रपटाविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते, चित्रपटात लष्कराचं योग्य प्रकारे चित्रीकरण करण्यात आलेलं नाही.

यूपीमध्येही बंदीची मागणी

याआधी सनातन रक्षक सेना या हिंदू संघटनेच्या काही सदस्यांनी आमिरच्या चित्रपटाविरोधात उत्तर प्रदेशात निदर्शनं केली होती. लाल सिंग चड्ढावर बंदी आणण्याची त्यांची मागणी होती. या विरोधामागील कारण आमिर खान होता. त्याच्यावर हिंदू देवतांची चेष्टा केल्याचा आरोप करण्यात आला होता. संघटनेच्या सदस्यांनी चित्रपटाविरोधात घोषणाबाजी केली आणि अभिनेता आमिर खानवर त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.