Box Office Report: नफ्यापेक्षा तोटाच मोठा; ‘या’ बॉलिवूड चित्रपटांचं झालं इतक्या कोटींचं नुकसान

मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकले नाहीत. लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha), शमशेरा, सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) सारख्या चित्रपटांना किती नुकसान (Loss) सोसावा लागला, याबद्दल जाणून घेऊयात..

Box Office Report: नफ्यापेक्षा तोटाच मोठा; 'या' बॉलिवूड चित्रपटांचं झालं इतक्या कोटींचं नुकसान
'या' बॉलिवूड चित्रपटांचं झालं इतक्या कोटींचं नुकसानImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 8:20 AM

2022 या वर्षात आतापर्यंत RRR, केजीएफ- चाप्टर 2, कार्तिकेय 2 यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांनी दमदार कमाई केली. केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात या चित्रपटांची क्रेझ पहायला मिळाली. साऊथ स्टार्स आता ‘पॅन इंडिया’ स्टार्स म्हणून ओळखले जाऊ लागले. तर दुसऱ्या बाजूला बॉलिवूड चित्रपट मात्र एकामागोमाग दणक्यात आपटले. मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकले नाहीत. लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha), शमशेरा, सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) सारख्या चित्रपटांना किती नुकसान (Loss) सोसावा लागला, याबद्दल जाणून घेऊयात..

1- लाल सिंग चड्ढा- आमिर खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित लाल सिंग चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनपेक्षितरित्या फ्लॉप ठरला. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या रिपोर्टनुसार या चित्रपटाचं 100 कोटींचं नुकसान झालं आहे. इतकंच नव्हे तर नेटफ्लिक्सनेही हा चित्रपट ओटीटी प्रदर्शित करण्याचा करार रद्द केल्याचं कळतंय.

2- शमशेरा- रणबीर कपूरने ‘शमशेरा’ या चित्रपटातून जवळपास चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. जवळपास 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचं 50 कोटींपेक्षा अधिक नुकसान झालं आहे.

हे सुद्धा वाचा

3- जयेशभाई जोरदार- रणवीर सिंगच्या या चित्रपटाने फक्त 15.59 कोटी रुपयांची कमाई केली. जवळपास 86 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता. 70 कोटींपेक्षा अधिक नुकसान या चित्रपटाचं झालं आहे.

4- सम्राट पृथ्वीराज- अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपटसुद्धा अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, हा चित्रपट जवळपास 200 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. सम्राट पृथ्वीराजने 66 कोटींचा गल्ला जमवला. त्यामुळे अक्षयच्या या चित्रपटाचं जवळपास 134 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.

5- हिरोपंती 2- 70 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला अभिनेता टायगर श्रॉफचा हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपटाने फक्त 24 कोटी रुपये कमावले. हिरोपंती 2 या चित्रपटाला 46 कोटींचा तोटा सहन करावा लागला.

6- रनवे 34- अमिताभ बच्चन, अजय देवगण, रकुल प्रीत सिंह यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट जवळपास 55 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाने फक्त 32 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाचं 18 कोटींचं नुकसान झालं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.