Laal Singh Chaddha trailer: ‘जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है’, लाल सिंग चड्ढाचा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झालेला आणि ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या 'फॉरेस्ट गम्प' या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एका सर्वसामान्य मुलाच्या असामान्य कथेची झलक दाखवण्यात आली आहे.

Laal Singh Chaddha trailer: 'जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है', लाल सिंग चड्ढाचा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?
Laal Singh ChaddhaImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 8:47 AM

जवळपास चार वर्षांनंतर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. रविवारी आयपीएलच्या फिनालेदरम्यान (IPL 2022 finale) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट 1994 मध्ये प्रदर्शित झालेला आणि ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एका सर्वसामान्य मुलाच्या असामान्य कथेची झलक दाखवण्यात आली आहे. करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा ट्रेलर शेअर करताना खास पोस्ट लिहिली. ‘कोरोना महामारी, दोन लॉकडाउन आणि त्यानंतर झालेलं बाळ.. या सर्वांमुळे हा प्रवास माझ्यासाठी खूपच खास आहे’, असं तिने त्यात म्हटलंय. विशेष म्हणजे करीनाचा छोटा मुलगा ‘जेह’ हासुद्धा या चित्रपटाचा एक भाग होता, असं तिने लिहिलंय. चित्रपटाच्या शूटिंगवेळी ती गरोदर होती.

मोना सिंगने लाल सिंगच्या आईची भूमिका साकारली आहे. लहानपणी दिव्यांग असलेल्या आमिरसोबत अचानक चमत्कार घडतो आणि तो मोठा होऊन धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतो. धावपटू झाल्यानंतर तो भारतीय सैन्यदलात सहभागी होतो. यावेळी दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यचीही झलक पहायला मिळते. करीना यामध्ये विम्मीची भूमिका साकारतेय, जिच्यावर लाल सिंगचं प्रेम असतं. तिच्यासोबत त्याला लग्न करायचं असतं, पण पुढे आपलं काहीच होऊ शकणार नाही, असं विम्मी त्याला म्हणते. मूळ अमेरिकन चित्रपटाप्रमाणेच यातही भारतीय इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी दाखवण्यात येतात. ‘माँ कहती है जिंदगी गोलगप्पे की तरह होती है, पेट भरता है लेकीन मन नहीं भरता’, हा संवाद ट्रेलरच्या अखेरीस ऐकायला मिळतो.

हे सुद्धा वाचा

पहा ट्रेलर-

एकंदरीत चित्रपटाच्या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली आहे. करीना, मोना आणि आमिर हे ‘थ्री इडियट्स’मधील त्रिकूट पुन्हा एकदा एकत्र आलं आहे. यातील ‘कहानी’ हे गाणं आधीच सोशल मीडियावर हिट ठरलंय. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.