Sushmita Sen and Lalit Modi: ‘ये कब हुआँ?’, सुष्मिता सेन-ललित मोदी यांनी रिलेशनशिप जाहीर करताच मीम्सना उधाण

ललित मोदी यांची ही पोस्ट क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर यावरून मीम्ससुद्धा व्हायरल होऊ लागले. 'हे कधी झालं?' असा प्रश्न चाहते त्यावर विचारू लागले.

Sushmita Sen and Lalit Modi: 'ये कब हुआँ?', सुष्मिता सेन-ललित मोदी यांनी रिलेशनशिप जाहीर करताच मीम्सना उधाण
Sushmita Sen and Lalit ModiImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 10:21 AM

आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती ललित मोदी (Lalit Modi) यांनी गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे (Sushmita Sen) रोमँटिक फोटो पोस्ट करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये सुष्मितासोबतच्या व्हेकेशनचे दोन जुने आणि दोन नवे फोटो पहायला मिळत आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी सुष्मिताला ‘बेटर हाफ’ (Better Half) असं म्हटलंय. ‘नवीन सुरुवात आणि नवीन आयुष्य’ याबद्दलही त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय. त्यांच्या या पोस्टने सुष्मिताचे असंख्य चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

सुष्मितासोबतचे फोटो पोस्ट करत ललित यांनी लिहिलं, ‘कुटुंबीयांसोबत आणि माझी बेटर हाफ सुष्मिता सेन हिच्यासोबत जागतिक टूरनंतर आताच लंडनला पोहोचलोय. अखेर एका नव्या आयुष्याची सुरुवात. अत्यंत आनंदी.’ या पोस्टच्या अखेरीस त्यांनी काही किसिंगचे आणि हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये दोघांचा सेल्फी पहायला मिळत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ललित हे प्रेमाने सुष्मिताच्या केसांना कुरवाळताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

ललित मोदी यांचं ट्विट-

ललित मोदी यांची ही पोस्ट क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर यावरून मीम्ससुद्धा व्हायरल होऊ लागले. ‘हे कधी झालं?’ असा प्रश्न चाहते त्यावर विचारू लागले. ‘हे काय आहे? मला वाटलं ती रोहमनसोबत आहे’ असंही एकाने लिहिलं. सुष्मिता आधी रोहमन शॉल याला डेट करत होती. ‘ही मस्करी आहे का? कारण मला त्यावर विश्वास नाही’ असंही काहींनी लिहिलं. ते कदाचित बिझनेस पार्टनर असू शकतात असाही अंदाज काही चाहत्यांनी वर्तविला. ललित मोदी आणि सुष्मिताच्या लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलं. त्यावर नंतर ललित यांनी स्पष्टीकरण दिलं. मी आणि सुष्मिताने लग्न केलं नसून आम्ही फक्त डेट करत आहोत. एकेदिवशी लग्नसुद्धा करू, असं त्यांनी ट्विट करत म्हटलं.

व्हायरल मीम्स-

सुष्मिता ही मॉडेल रोहमन शॉलला डेट करत होती. गेल्या वर्षी या दोघांचं ब्रेकअप झालं. ‘आम्ही मैत्रीने सुरुवात केली होती आणि आता ती मैत्रीच कायम ठेवू. आमचं रिलेशनशिप आता राहिलं नाही, पण प्रेम मात्र नक्कीच असेल’, असं सुष्मिताने इन्स्टाग्रामवर डिसेंबरमध्ये रोहमनसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.