AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: “कितना फोटो निकालोगे”; सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर भडकली मलायका अरोरा

इन्स्टाग्रामवर अनेक चाहत्यांनी मलायकाचा हा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. जिममधून (Gym) बाहेर पडताच तिच्या अनेक चाहत्यांनी सेल्फीसाठी तिच्याभोवती गर्दी केली होती. त्यातील एका चाहत्याला मलायका जे बोलली, त्यामुळे हा व्हिडिओ चर्चेत आहे.

Video: कितना फोटो निकालोगे; सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर भडकली मलायका अरोरा
Malaika AroraImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 12:00 PM
Share

बॉलिवूडची सुपरमॉडेल मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या फॅशन सेन्सबद्दल तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल.. प्रत्येक वेळी चाहत्यांना मलायका अरोराची नवीन आणि आकर्षक शैली पाहायला मिळते. सध्या मलायकाचा एक नवीन व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर अनेक चाहत्यांनी मलायकाचा हा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. जिममधून (Gym) बाहेर पडताच तिच्या अनेक चाहत्यांनी सेल्फीसाठी तिच्याभोवती गर्दी केली होती. त्यातील एका चाहत्याला मलायका जे बोलली, त्यामुळे हा व्हिडिओ चर्चेत आहे.

‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कुब्रा सैतची जिमच्या बाहेर मलायका अरोराशी भेट झाली. यावेळी दोघी एकमेकांसोबत गप्पा मारू लागल्या. तितक्यात एक व्यक्ती आला आणि तो मलायकासोबत सेल्फी काढू लागला. मग काय.. भडकलेली मलायका त्याला म्हणाली “भाई किती फोटो काढणार? आताच तू फोटो काढलेस ना”. मलायका अरोराच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. एका चाहत्याने लिहिलं, ‘हे अतिशय असभ्य वर्तन आहे’. तर एकाने म्हटलं की, त्यांना खूप गर्व आहे. त्याच वेळी काही नेटकऱ्यांनी सतत सेल्फी घेणाऱ्या त्या व्यक्तीवरही टीका केली.

पहा व्हिडीओ-

मलायका अरोराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. या दोघांचं प्रेम कोणापासून लपलेलं नाही. अनेकदा दोघांनाही त्यांच्या वयातील अंतरावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण दोघंही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि प्रसंगी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतानाही दिसतात. मलायका ही 48 वर्षांची असून अर्जुन हा 36 वर्षांचा आहे. या दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. जवळपास गेल्या चार वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत नातं जगजाहीर केलं होतं. त्याआधी दोघांनीही माध्यमांपासून आपलं रिलेशनशिप लपवण्याचा प्रयत्न केला होता. आता लवकरच ही जोडी विवाहबद्ध होणार असल्याचं समजतंय.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.