Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीने अनेकदा विकत घेतला होता गांजा; सुशांत प्रकरणात NCBचा दावा

याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. एनसीबीने हे देखील उघड केलं की रिया चक्रवर्ती, शौविक यांच्यासह सर्व आरोपींनी मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत षडयंत्र रचलं होतं. जेणेकरून ते बॉलिवूड आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये ड्रग्जची विक्री आणि खरेदी करु शकतील.

Rhea Chakraborty: रिया चक्रवर्तीने अनेकदा विकत घेतला होता गांजा; सुशांत प्रकरणात NCBचा दावा
Rhea Chakraborty, Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 11:18 AM

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मोठा खुलासा केला आहे. एनसीबीने दावा केला आहे की सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) तिचा भाऊ शौविकसह इतर आरोपींकडून अनेकदा गांजा विकत घेतला होता आणि तो सुशांतला दिला होता. NCB ने नुकतंच NDPS कोर्टात सुशांतच्या मृत्यू प्रकरणी 35 आरोपींविरुद्ध आरोप दाखल केला आहे. याप्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. एनसीबीने हे देखील उघड केलं की रिया चक्रवर्ती, शौविक यांच्यासह सर्व आरोपींनी मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत षडयंत्र रचलं होतं. जेणेकरून ते बॉलिवूड आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये ड्रग्जची विक्री आणि खरेदी करु शकतील.

या कलमान्वये गुन्हा दाखल

एनसीबीने मंगळवारी दावा केला की आरोपींनी मुंबईत केवळ अंमली पदार्थांची तस्करी केली नाही तर गांजा, चरस, कोकेन यांसारख्या अंमली पदार्थांचा वापरही केला. या सर्व आरोपींविरुद्ध बेकायदेशीर तस्करी आणि गुन्हेगारांना आश्रय दिल्याबद्दल कलम 27 आणि 27 अ लागू करण्यात आले आहेत. याशिवाय कलम 28 आणि कलम 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आता पुढे काय होणार?

आरोप निश्चित करण्यापूर्वी न्यायालय सर्व आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जावर विचार करेल. एनडीपीएस कायद्याशी संबंधित खटल्यांची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 27 जुलैची तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच आता पुढील सुनावणी 15 दिवसांनी होणार आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.