Neena Gupta: “मी त्यांचा तिरस्कार..”, विवियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबद्दल नीना गुप्ता यांनी सोडलं मौन

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना यांनी त्यांच्या एक्स बॉयफ्रेंड आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबतच्या (Vivian Richards) नात्याबद्दल मौन सोडलं आहे. नीना आणि विवियन यांचं नातं ८०च्या दशकात फार चर्चेत होतं.

Neena Gupta: मी त्यांचा तिरस्कार.., विवियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबद्दल नीना गुप्ता यांनी सोडलं मौन
विवियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबद्दल नीना गुप्ता यांनी सोडलं मौनImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 12:58 PM

ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नीना या नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. नेटकऱ्यांकडून त्यांना पसंती मिळते. याशिवाय त्या बिनधास्तपणे आपली मतं मांडण्यासाठीही ओळखल्या जातात. आपलं जीवन आपल्या अटी-शर्तींवर जगा, लोक काय म्हणतात याची पर्वा करू नका, असं त्या नेहमी म्हणतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना यांनी त्यांच्या एक्स बॉयफ्रेंड आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबतच्या (Vivian Richards) नात्याबद्दल मौन सोडलं आहे. नीना आणि विवियन यांचं नातं ८०च्या दशकात फार चर्चेत होतं. या दोघांनी लग्न केलं नाही. मसाबा (Masaba Gupta) ही नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित फॅशन डिझायनरसुद्धा आहे. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं.

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत नीना म्हणाल्या “माझा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार कसा करू शकता? तुम्ही त्या व्यक्तीशिवाय जगू शकत नाही. आम्ही एकत्र राहत नसलो तरी मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडचा तिरस्कार करत नाही. मी माझ्या पूर्वाश्रमीच्या पतीचाही तिरस्कार करत नाही. मी त्यांचा द्वेष का करावा? जर मला एखादी व्यक्ती इतकी वाईट वाटत असेल, तर मी त्या व्यक्तीचं मूल जन्माला का घालेन? मी वेडी आहे का?”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Masaba (@masabagupta)

मसाबा गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांचं नातं

फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांचं नातं खूप चांगलं आहे. दोघंही अनेकदा एकत्र वेळ घालवतात. मसाबा त्यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. विवियनशी लग्न जरी केलं नसलं तरी नीना यांनी मसाबा आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. खुद्द मसाबाने याविषयी एका मुलाखतीत सांगितलं होतं. “आईने कधीच माझं आणि वडिलांचं नातं बिघडवण्याचा प्रयत्न केला नाही. वडिलांसोबत माझं चांगलं नातं आहे. आईने मला नेहमीच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. माझ्या आयुष्यात कोण कोणती भूमिका साकारणार, हे त्यांनी माझ्यावर सोडलं आहे,” असं मसाबा म्हणाली होती.

नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स हे 1980 च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. विवियन यांच्याशी लग्न झालं नसलं तरी नीना यांनी 1989 मध्ये मसाबाला जन्म दिला. त्यावेळी विवियन यांचं लग्न झालं होतं. त्यामुळे त्यांनी नीनासाठी पत्नीला सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. त्यानंतर 2008 मध्ये नीना यांनी विवेक मेहरासोबत लग्न केलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.