Bobby Deol: ‘इतका कसला ॲटिट्यूड आहे तिला?’, बॉबी देओलची पत्नी तान्या सोशल मीडियावर ट्रोल

या व्हिडीओमधील तान्याची देहबोली आणि बॉबीसोबत तिची वागणूक नेटकऱ्यांना खटकली असून अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर वीरल भयानीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ (Viral Video) पोस्ट केला आहे.

Bobby Deol: 'इतका कसला ॲटिट्यूड आहे तिला?', बॉबी देओलची पत्नी तान्या सोशल मीडियावर ट्रोल
Bobby DeolImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 5:46 PM

प्रसिद्ध गायक अर्जुन कानुंगोने नुकतीच कार्ल्स डेनिसशी लग्नगाठ बांधली. या दोघांनी लग्नाच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांना आमंत्रित केलं होतं. या रिसेप्शनला अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) पत्नी तान्या देओलसोबत (Tanya Deol) हजेरी लावली होती. या दोघांनी एकत्र फोटोसाठी पोझसुद्धा दिला. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून बॉबी देओलची पत्नी तान्यावर नेटकरी टीका करत आहेत. या व्हिडीओमधील तान्याची देहबोली आणि बॉबीसोबत तिची वागणूक नेटकऱ्यांना खटकली असून अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर वीरल भयानीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ (Viral Video) पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताच त्यावर तान्याविरोधात कमेंट्स येऊ लागले.

‘तिच्यामुळे बॉबी देओलला कॅमेरामनसमोर लाज वाटली’, असं एकाने लिहिलं. तर ‘तिला कसला इतका ॲटिट्यूड आहे’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘ती खूपच असभ्य वागली’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर कार्यक्रमात येण्यापूर्वी या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं असावं, असाही अंदाज युजर्सनी वर्तवला आहे. लग्नाच्या 15-20 वर्षांनंतर हेच होतं, असंही एकाने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

बॉबी देओल नुकताच ‘आश्रम 3’ या वेब सीरिजमध्ये झळकला. या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये बॉबीसोबतच इशा गुप्ता, चंदन रॉय सन्याल, अनुप्रिया गोयंका, श्रिधा चौधरी, तुषाप पांडे यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रकाश झा दिग्दर्शित या वेब सीरिजवर अनेक आरोपही झाले होते. हिंदू धर्मीयांना यामध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. इतकंच नव्हे तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून गेल्या वर्षी भोपाळमधील या सीरिजच्या सेटवर तोडफोडसुद्धा करण्यात आली होती.

हेही वाचाAirtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.