Daler Mehndi: मानवी तस्करी प्रकरणी दलेर मेहंदींना दिलासा नाहीच; 15 सप्टेंबरपर्यंत राहावं लागणार तुरुंगात

सध्या दलेर मेहंदी हे गेल्या 6 दिवसांपासून पटियाला सेंट्रल जेलमध्ये आहेत. माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिद्धू यांच्या बॅरेकमध्ये त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं आहे.

Daler Mehndi: मानवी तस्करी प्रकरणी दलेर मेहंदींना दिलासा नाहीच; 15 सप्टेंबरपर्यंत राहावं लागणार तुरुंगात
मानवी तस्करी प्रकरणी दलेर मेहंदींना दिलासा नाहीचImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 2:08 PM

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. दलेर मेहंदी यांच्यावर मानवी तस्करीचा (human trafficking case) आरोप आहे. पटियाला न्यायालयाने त्यांना 2003 च्या एका मानवी तस्करी प्रकरणात दोषी मानत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तसंच मेहंदी यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या शिक्षेविरोधात दलेर मेहंदी यांनी उच्च न्यायालयात (high court) याचिका दाखल केली होती. न्यायालयात सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दलेर यांनी किती काळ तुरुंगात काढला, अशी विचारणा केली. त्यावर मेहंदी यांच्या वकिलाने सांगितलं की, फार कमी काळापासून ते तुरुंगात आहेत. यानंतर हायकोर्टाने पंजाब सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. सध्या दलेर मेहंदी हे गेल्या 6 दिवसांपासून पटियाला सेंट्रल जेलमध्ये आहेत. माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिद्धू यांच्यासोबत त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. तुरुंगात ते विशेष आहाराऐवजी नेहमीचाच आहार घेत आहेत.

2003 मध्ये भावाविरोधात गुन्हा दाखल

दलेर मेहंदी पूर्वी परदेशात शो करण्यासाठी जायचे. त्यांच्या टीमसह 10 जणांना बेकायदेशीररीत्या सदस्य बनवून अमेरिकेला पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ज्याच्या मोबदल्यात त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप आहे. 2003 मध्ये दलेरचा भाऊ समशेर सिंग यांच्याविरुद्ध मानवी तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तपासादरम्यान दलेर मेहंदी यांचंही नाव समोर आलं.

सत्र न्यायालयाने ट्रायल कोर्टाची शिक्षा कायम ठेवली

या प्रकरणी 2018 मध्ये पटियालाच्या ट्रायल कोर्टाने दलेर मेहंदी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध दलेर यांनी पटियाला सत्र न्यायालयात अपील केलं. 5 दिवसांपूर्वी पटियालाच्या सत्र न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम ठेवत निकाल दिला होता. त्यानंतर दलेर यांना अटक करून पटियाला जेलमध्ये पाठवण्यात आलं. दलेर मेहंदी यांना पटियालाच्या तुरुंगात नवज्योत सिद्धू यांच्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.