Brahmastra Twitter Review: रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ पाहिल्यानंतर अशी आहे लोकांची पहिली प्रतिक्रिया
ब्रह्मास्त्र हा चित्रपट तब्बल 410 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी टीमला जवळपास पाच वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे हा बिग बजेट चित्रपट कसा असेल, याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांना होती.
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. ट्विटरवर अनेकजण या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी करत आहेत. आता फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटात रणबीर-आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. तसंच शाहरुख खानसुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.
ब्रह्मास्त्र हा चित्रपट तब्बल 410 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी टीमला जवळपास पाच वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे हा बिग बजेट चित्रपट कसा असेल, याची प्रचंड उत्सुकता चाहत्यांना होती. या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगसुद्धा चांगली झाली. काहींना रणबीर-आलियाचा हा चित्रपट खूपच आवडला आहे. यातील कलाकारांचं अभिनय आणि संगीत खूप छान असल्याचं काहींनी म्हटलंय.
MUSIC OF BRAHMASTRA IS AS HUGE AS ITS CHARACTERS, ACTION , AND THE VFX, PRITAM truly went all out. Full album has 2 more songs and additional versions (this was revealed prior) #BrahmastraReview that one new song is another blockbuster.
— ???? BRAHMASTRA’s DAY ???? (@boyfriendkapoor) September 9, 2022
It is the best theatrical experience I have had it a while, action scenes are the type I would watch it on repeat. I like it so much that I have theories ready. GO FOR 3D #BrahmastraReview
— ???? BRAHMASTRA’s DAY ???? (@boyfriendkapoor) September 9, 2022
काहींना ब्रह्मास्त्र अजिबात आवडला नाही. ‘ब्रह्मास्त्र बघण्यापेक्षा नागिनची सीरिअल पहा’ अशा शब्दांत एकाने नाराजी व्यक्त केली. तर चित्रपटाचा मध्यांतरापूर्वीचा भाग ठीक असून त्यानंतरचा भाग खूपच लांब आणि कंटाळवाणा असल्याचं दुसऱ्याने म्हटलंय. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनेही या चित्रपटाला फक्त दोन स्टार दिले आहेत. चित्रपटात व्हिएफएक्सची कमाल आहे, पण कथेत दम नाही असं त्यांनी म्हटलंय.
Mega disaster
Better watch Nagin serial
— Seedhi Baat No Bakwaas (@SRKSalmanFan) September 9, 2022
#OneWordReview…#Brahmasthra: DISAPPOINTING. Rating: ⭐️ Doesn’t meet the sky-high expectations…Like every time, this time too Bollywood proved its filth in front of the world…. #AliaBhatt very bad, … #BrahmastraReview#ब्रह्मास्त्र_का_बहिष्कार#BoycottBramhastraMovie pic.twitter.com/haiZZNqizI
— Adv Gautam kumar yadav (@askgautamkumar) September 9, 2022
Audience after first 30 min of Brahmastr:#brahmastrareview pic.twitter.com/nC8NNbVcme
— Kangana Ranaut (@TeamKangana2) September 8, 2022
ब्रह्मास्त्रची ॲडव्हान्स बुकिंग चांगली झाल्याने पहिल्या दिवसाची आणि पहिल्या वीकेंडची कमाई समाधानकारक होऊ शकते. मात्र त्यानंतर माऊथ पब्लिसिटीचा चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.