Ranveer Singh: न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंग अखेर पोलिसांसमोर हजर

याप्रकरणी रणवीरला समन्स बजावण्यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याच्या घरी पोहोचले होते, मात्र त्यावेळी तो घरी उपस्थित नव्हता. पोलिसांनी रणवीरला 22 ऑगस्टपर्यंत जबाब नोंदवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर रणवीरने मुंबई पोलिसांकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता.

Ranveer Singh: न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंग अखेर पोलिसांसमोर हजर
Ranveer SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 12:39 PM

न्यूड फोटोशूटप्रकरणी (Nude Photoshoot) अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. ‘पेपर’ या मॅगझिनसाठी रणवीरने न्यूड फोटोशूट केलं होतं. या बोल्ड फोटोशूटवरून सोशल मीडियावर मोठा वाद झाला होता. याप्रकरणी रणवीरला समन्स बजावण्यासाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याच्या घरी पोहोचले होते, मात्र त्यावेळी तो घरी उपस्थित नव्हता. पोलिसांनी रणवीरला 22 ऑगस्टपर्यंत जबाब नोंदवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर रणवीरने मुंबई पोलिसांकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता. अखेर सोमवारी तो चेंबूर पोलिसांसमोर हजर झाला. रणवीरने चेंबूर पोलीस ठाण्यात न्यूड फोटोशूटप्रकरणी आपला जबाब नोंदविला. त्याचप्रमाणे यापुढेही पुन्हा चौकशीसाठी बोलावलं तर सहकार्य करेन, असं तो म्हणाला.

गेल्या महिन्यात रणवीरने ‘पेपर’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं होतं, ज्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. ट्रोल झाल्यानंतर रणवीर सिंगने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, “हे माझं आयुष्य आहे आणि मी माझं काम कोणत्याही प्रकारे करू शकतो. मला वाटल्यास मी हजार लोकांसमोर न्यूड होऊ शकतो आणि त्यामुळे मला काही फरक पडत नाही. पण मी असं केलं तर लोकांची गैरसोय होईल.”

हे सुद्धा वाचा

रणवीरच्या या न्यूड फोटोशूटवर महिला आयोगानेही आक्षेप घेतला होता. तर दुसरीकडे त्याच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड स्टार्स उभे राहिले. रणवीरची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फोटोग्राफर आशिष शाहने रणवीरचं हे फोटोशूट केलं होतं. यासाठी त्यांना तीन तास लागले. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आशिषने शूटिंगचा अनुभव सांगितला होता. “आपण प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडू शकतो. रणवीर त्याच्या बॉडीबाबत खूपच कम्फर्टेबल होता. रणवीरसारख्या अष्टपैलू अभिनेत्याने मला हवं तसं फोटोशूट करण्याची परवानगी दिली हे पुरेसं होतं. हे अनेकदा सेलिब्रिटींसोबत घडताना दिसतं. जेव्हा तुम्ही त्यांच्या आजूबाजूला असता तेव्हा तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने त्यांच्यासोबत वागावं लागतं. पण रणवीरच्या बाबतीत तसं झालं नाही. त्याच्या चित्रपटांबद्दल आणि दिग्दर्शकांशी एकत्र काम करण्याबद्दल आम्ही खूप बोललो. त्याच्या फोटोशूटवरून होणारा हा गोंधळ विनाकारण आहे,” असंही मत त्याने मांडलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.