Ratna Pathak Shah: “महिलांसाठी काहीच बदललं नाही, आपल्याला सौदी अरेबियासारखा देश व्हायचा आहे का?” रत्ना पाठक शाह यांचा सवाल

रुपेरी पडद्यावर अनेक सशक्त पात्रांमध्ये दिसणाऱ्या रत्ना पाठक शहा यांनी आता देशाच्या आणि महिलांच्या (Women) स्थितीबाबत असं विधान केलंय, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Ratna Pathak Shah: महिलांसाठी काहीच बदललं नाही, आपल्याला सौदी अरेबियासारखा देश व्हायचा आहे का? रत्ना पाठक शाह यांचा सवाल
"आपल्याला सौदी अरेबियासारखा देश व्हायचा आहे का?" रत्ना पाठक शाह यांचा सवाल Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 9:16 AM

अभिनेत्री आणि नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची पत्नी रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) या सहसा वाद आणि वादग्रस्त विधानांपासून दूर राहतात, परंतु प्रसंगी आपलं मत व्यक्त करण्यास त्या कचरत नाहीत. रुपेरी पडद्यावर अनेक सशक्त पात्रांमध्ये दिसणाऱ्या रत्ना पाठक शहा यांनी आता देशाच्या आणि महिलांच्या (Women) स्थितीबाबत असं विधान केलंय, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. रत्ना पाठक शहा यांनी म्हटलं आहे की, देशातील महिलांसाठी अजूनही काहीही बदललेलं नाही आणि देश परंपरावादी बनत चालला आहे. आपल्याला सौदी अरेबियासारखा देश बनवायचा आहे का, असा सवाल रत्ना पाठक यांनी केला आहे. त्यांनी नुकतीच ‘पिंकविला’ या वेबसाईटला मुलाखत दिली. त्यात त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीपासून ते सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव आणि देशातील सद्यस्थिती याविषयी बेधडकपणे आपली मतं मांडली. रत्ना पाठक म्हणाल्या की, “देश परंपरावादी होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण समाज सनातनी बनत चालला आहे. आपल्या देशातील महिला आजही जुन्या चालीरीती, प्रथा पाळत आहेत.”

“जेव्हा समाज रुढीवादी असतो, तेव्हा तो सर्वप्रथम स्त्रियांवर आपली पकड घट्ट करतो. जगातील सर्व रुढीवादी समाजाकडे पाहिल्यास तुम्हाला दिसेल की महिलांना सर्वाधिक त्रास होतो. आजही महिलांमध्ये काहीही बदल झालेला नाही आणि बदल झाला असला तरी तो फारच किरकोळ आहे. लोक आता अंधश्रद्धाळू होत चालले आहेत. त्यांना धर्म स्वीकारण्यास आणि त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनवण्यास भाग पाडले जात आहे,” असं त्यांनी म्हटलं.

रत्ना पाठक यांनी स्वत:चं उदाहरणही दिलं की त्यांना करवा चौथ व्रत पाळत आहे का, असं एकाने विचारलं होतं. रत्ना म्हणाल्या, “मी वेडी आहे का? आजच्या युगातील सुशिक्षित स्त्रिया करवा चौथ व्रत पाळतात ही भीतीदायक गोष्ट नाही का? पतीच्या दीर्घायुष्याची कामना केली जाते. पण देशाचा विचार केला तर ‘विधवा’ या संकल्पनेचा संदर्भ किती भयावह आहे. म्हणजे वैधव्य दूर ठेवण्यासाठी मी काहीही करेन. खरंच का? एकविसाव्या शतकात आपण कशाबद्दल बोलत आहोत? सुशिक्षित महिलाच हे करत आहेत.”

हे सुद्धा वाचा

‘आपल्याला सौदी अरेबियासारखा देश व्हायचा आहे का?’

रत्ना पाठक शहा पुढे सौदी अरेबियाचं उदाहरण देत म्हणाल्या, “सौदी अरेबियात महिलांना काय वाव आहे? आपल्याला सौदी अरेबियासारखा देश व्हायचा आहे का? आणि आपण त्यांच्यासारखे होऊ कारण ते खूप सोयीचं आहे. महिला घरात खूप काम करतात, त्यासाठी त्यांना पैसे मिळत नाहीत. महिलांना अशा परिस्थितीत ढकललं जातं.”

रत्ना पाठक शाह या प्रसिद्ध अभिनेत्री दिना पाठक यांच्या कन्या आहेत. दीना पाठक या 50, 60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रत्ना पाठक शाह यांनी 1983 मध्ये श्याम बेनेगल यांच्या मंडी चित्रपटातून पदार्पण केले. आता त्या लवकरच ‘धक धक’ चित्रपटात दिसणार आहेत. तापसी पन्नू या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ‘धक धक’मध्ये संजना संघी, फातिमा सना शेख आणि दिया मिर्झा यांच्याही भूमिका आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.