Sushant Singh Rajput: रिया चक्रवर्तीसोबत सुशांतचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो; आठवणीत लिहिली पोस्ट

दोन वर्षांपूर्वी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी अद्यापही पोलिसांचा तपास सुरू आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलनेही तपास करण्यात आला. त्यावेळी रियाला एनसीबीने अटक केली होती.

Sushant Singh Rajput: रिया चक्रवर्तीसोबत सुशांतचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो; आठवणीत लिहिली पोस्ट
Rhea Chakraborty and Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 1:03 PM

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं (Sushant Singh Rajput) 14 जून 2020 रोजी निधन झालं. सुशांतला जाऊन दोन वर्षे झाली असून त्याच्या आठवणीत अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिनेसुद्धा त्याच्यासोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ‘तुझी दररोज आठवण येते’, असं कॅप्शन रियाने या फोटोंना दिलं आहे. रियाने पोस्ट केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘आम्हालाही त्याची आठवण येते’, अशा शब्दांत सुशांतचे चाहते व्यक्त झाले. दोन वर्षांपूर्वी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणी अद्यापही पोलिसांचा तपास सुरू आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलनेही तपास करण्यात आला. त्यावेळी रियाला एनसीबीने अटक केली होती. रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती अनेक दिवस तुरुंगात होते. या दोघांनी जामिनावर सुटका झाली आहे. (Sushant death anniversary)

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘भाई, तू जाऊन दोन वर्षे पूर्ण झाली. पण ज्या नीतीमूल्यांच्या आधारावर तू जगलास, त्यामुळे तू आमच्यासाठी अमर आहेस. तुला अनेकांसाठी खूप काही करायचं होतं. दया, प्रेम, करुणा या भावना तुझ्यात होत्या. आज तू जरी आमच्यात नसलास तरी तुझ्या नीतीमूल्यांच्या मार्गावर आम्ही चालू’, असं त्यांनी लिहिलं. यासोबतच त्यांनी सुशांतचा एका लहान मुलासोबतचा फोटो पोस्ट केला.

हे सुद्धा वाचा

रियाची पोस्ट-

सुशांतच्या बहिणीची पोस्ट-

मुकेश छाब्राची पोस्ट-

कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनीसुद्धा सुशांतसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ हा मुकेशनेच दिग्दर्शित केला होता. सुशांतच्या निधनानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांतसोबत भूमिका साकारलेली अभिनेत्री संजना संघी हिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सुशांतसोबतचा सेटवरचा फोटो पोस्ट करत ‘We Miss You’ असं लिहिलं.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.