Richa-Ali Wedding: 110 वर्षं जुन्या ‘या’ ऐतिहासिक ठिकाणी होणार रिचा-अलीचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन

अली फजल आणि रिचा चड्ढा यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कायमच मनमोकळेपणे बोलणं पसंत केलं. अली-रिचाची जोडी ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटात एकत्र झळकली होती.

Richa-Ali Wedding: 110 वर्षं जुन्या 'या' ऐतिहासिक ठिकाणी होणार रिचा-अलीचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन
रिचा-अलीचं प्री-वेडिंग सेलिब्रेशनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 6:16 PM

अभिनेता अली फजल (Ali Fazal) आणि अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. रिचा आणि अली दोन वर्षांपूर्वीच लग्न करणार होते. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. अखेर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. रिचा-अली यांचं प्री-वेडिंग शूट दिल्लीच्या (Delhi) आयकॉनिक हॉटेलमध्ये पार पडणार असल्याचं समजतंय.

ताज्या रिपोर्ट्सनुसार, रिचा चड्ढा आणि अली फजल यांचं लग्न दिल्लीतल्या प्रसिद्ध दिल्ली जिमखाना क्लबमध्ये होणार असल्याचं कळतंय. हे क्लब 1913 मध्ये बनवण्यात आल्याचं म्हटलं जातं. या ऐतिहासिक क्लबच्या सदस्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. रिचा आणि अलीने 2020 मध्येच वेडिंग प्लॅनिंग पूर्ण केलं होतं. मात्र कोरोना महामारीमुळे त्यांना वाट पाहावी लागली.

हे सुद्धा वाचा

या दोघांचं लग्न अत्यंत रॉयल अंदाजात पार पडणार असल्याचं कळतंय. या क्लबमध्ये सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. दिल्ली जिमखाना क्लब हे देशातील सर्वात जुनं आणि सर्वात खास ठिकाणांपैकी एक आहे. या क्लबच्या सदस्यत्वासाठी जवळपास 37 वर्षांची वेटिंग लिस्ट असल्याचं सांगितलं जातं. या महिन्याच्या अखेरीस रिचा-अलीच्या प्री-वेडिंग सोहळ्याला सुरुवात होईल.

दिल्लीत प्री-वेडिंग सेलिब्रेशन पार पडल्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी मुंबईत रिचा आणि अली विवाहबद्ध होतील. तर 7 ऑक्टोबर रोजी रिसेप्शन आयोजित करण्यात आलं आहे.

अली फजल आणि रिचा चड्ढा यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कायमच मनमोकळेपणे बोलणं पसंत केलं. अली-रिचाची जोडी ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटात एकत्र झळकली होती. रिल लाईफ कपलने रिअल लाईफ कपल होण्याच्या दृष्टीने 2015 मध्ये सुरुवात केली.

74 व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये अलीच्या ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ या चित्रपटाचा प्रीमियर झाला, तेव्हा अली आणि रिचा यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. 2015 मध्ये डेटिंग सुरु झाल्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.