Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: शेकडो सेलिब्रिटींसमोर सलमान खान रडला; अखेर सुनील शेट्टीच्या मुलाने मारली मिठी

काही दिवसांपूर्वी अबुधाबीमध्ये पार पडलेल्या 'आयफा पुरस्कार सोहळ्या'त (IIFA Awards) सलमानने आपल्या संघर्षाच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी शेकडो सेलिब्रिटींसमोर त्याचे डोळे पाणावले होते.

Video: शेकडो सेलिब्रिटींसमोर सलमान खान रडला; अखेर सुनील शेट्टीच्या मुलाने मारली मिठी
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 10:57 AM

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आज सुपरस्टार असला तरी एकेकाळी त्यालासुद्धा संघर्ष करावा लागला होता. काही दिवसांपूर्वी अबुधाबीमध्ये पार पडलेल्या ‘आयफा पुरस्कार सोहळ्या’त (IIFA Awards) सलमानने आपल्या संघर्षाच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी शेकडो सेलिब्रिटींसमोर त्याचे डोळे पाणावले होते. हा व्हिडीओ कलर्स वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. एकेकाळी टी-शर्ट घेण्यासाठीही सलमानकडे पैसे नव्हते, तीच आठवण त्याने या पुरस्कार सोहळ्यात सांगितली. या सोहळ्याचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) केलं. रितेशनेच सलमानला त्याचा अविस्मरणीय क्षण कोणता, असा प्रश्न विचारला होता.

“करिअरच्या सुरुवातीच्या काळात माझ्याकडे फारसे पैसे नसायचे. मी एकदा सुनील शेट्टी यांच्या कपड्यांच्या दुकानात गेलो होतो. तिथे कपडे खूप महाग होते. एखादा शर्ट किंवा एखादा जीन्स विकत घेण्याइतकेच पैसे माझ्याकडे होते. सुनील शेट्टी यांना समजलं की माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. तेव्हा त्यांनी मला स्टोन वॉश शर्ट भेट म्हणून दिलं”, असं सलमान सांगतो. हे सांगत असताना त्याच्यासमोर सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी बसलेला पहायला मिळतो. सलमानचे डोळे पाणावल्याचं कळताच तो जागेवरून उठून सलमानला मिठी मारतो.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अबुधाबीमध्ये पार पडलेला आयफा पुरस्कार सोहळा लवकरच टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे. सलमान खान, रितेश देशमुख आणि मनिष पॉल यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. तर नोरा फतेही, टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, सारा अली खान यांसारख्या कलाकारांनी परफॉर्म केलं. सलमान सध्या त्याच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, जेसी गिल यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय त्याचा ‘टायगर 3’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.