Salman Khan: सलमानची अजब स्टाईल! अर्धा भरलेला ग्लास ठेवला खिशात, पहा Viral Video

सलमानच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'भाई, ग्लासमध्ये नेमकं काय आहे', असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला. 'जीन्सच्या पॉकेटमध्ये ग्लास, भाईची नवी स्टाईल', अशी कमेंट एका युजरने केली.

Salman Khan: सलमानची अजब स्टाईल! अर्धा भरलेला ग्लास ठेवला खिशात, पहा Viral Video
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 8:59 PM

अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. एका पार्टीमध्ये सलमानने केलेल्या एण्ट्रीची नेटकऱ्यांमध्ये विशेष चर्चा होतेय. व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) सलमानच्या हातात एक ग्लास पहायला मिळतोय. अर्ध्या भरलेल्या या ग्लासमध्ये नेमकं काय आहे, जे पाण्यासारखं दिसतंय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गाडीतून उतरताच सलमान त्याच्या हातात असलेला ग्लास (Glass) खिशात ठेवतो. सलमानची ही अजब स्टाईल पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत.

शनिवारी सलमानने मुराद खेतानीच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. कारमधून उतरताच त्याने हातात अर्धा भरलेला ग्लास जीन्सच्या उजव्या खिशात ठेवला. खिशात अडकवलेल्या ग्लासवर हात ठेवत त्याने पार्टीमध्ये प्रवेश केला. पार्टीतून परततानाही त्याच्या हातात तोच ग्लास दिसला. हातात तो ग्लास धरून तो कारच्या फ्रंट सीटवर बसला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

सलमानच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘भाई, ग्लासमध्ये नेमकं काय आहे’, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला. तर ‘वोडका की जिन टॉनिक’, असंही एकाने म्हटलं. ‘जीन्सच्या पॉकेटमध्ये ग्लास, भाईची नवी स्टाईल’, अशी कमेंट एका युजरने केली. सलमान अर्धा भरलेला ग्लास जीन्सच्या पाकिटात कसा ठेवू शकतो, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत पूजा हेगडे, व्यंकटेश डग्गुबत्ती, जगपती बाबू, राघव जुयाल आणि शहनाज गिल यांच्याही भूमिकात आहेत. याशिवाय त्याचा ‘टायगर 3’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये तो पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत झळकणार आहे. मेगास्टार चिरंजीवीच्या गॉडफादरमध्येही तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.