Sanya Malhotra: “तिथे अशी एकही महिला नसेल जिची छेडछेडा झाली नसेल”; ‘दंगल’ गर्ल म्हणते महिलांसाठी दिल्ली असुरक्षित

सान्या मल्होत्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिल्ली महिलांसाठी असुरक्षित असल्याचं सांगितलं. तिथे अजूनही अनेक महिलांना सुरक्षित वाटत नाही, असं ती म्हणाली.

Sanya Malhotra: तिथे अशी एकही महिला नसेल जिची छेडछेडा झाली नसेल; 'दंगल' गर्ल म्हणते महिलांसाठी दिल्ली असुरक्षित
'दंगल' गर्ल म्हणते महिलांसाठी दिल्ली असुरक्षित Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 2:41 PM

‘दंगल’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) ​​हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये खूप मोठा पल्ला गाठला आहे. सान्याने दमदार चित्रपटांमध्ये काम केलं असून तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मूळची दिल्लीची (Delhi) असलेल्या सान्या मल्होत्राने ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये ऑडिशन देऊन करिअरची सुरुवात केली. डान्सची आवड असलेल्या सान्याला आपण चित्रपटांमधून नाव कमवू असं कधीच वाटलं नव्हतं. सान्या ​​तिच्या करिअरसाठी दिल्लीहून मुंबईला (Mumbai) राहायला आली आणि गेल्या काही वर्षांपासून ती मुंबईतच राहत आहे. आता तिला दिल्लीपेक्षा मुंबईच अधिक आवडू लागली असून मुंबई ही महिलांसाठी अधिक सुरक्षित असल्याचं ती म्हणते.

सान्या मल्होत्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिल्ली महिलांसाठी असुरक्षित असल्याचं सांगितलं. तिथे अजूनही अनेक महिलांना सुरक्षित वाटत नाही, असं ती म्हणाली. सान्याने गेल्याच वर्षी मुंबईत हक्काचं घर घेतलं आणि आत ती इथेच स्थायिक झाली आहे. दिल्ली आणि मुंबईतील राहण्यातला फरक तिने या मुलाखतीत सांगितला.

हे सुद्धा वाचा

“दिल्ली महिलांसाठी सुरक्षित नाही”

दिल्ली महिलांसाठी असुरक्षित का वाटते असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “मी मूळची दिल्लीची आहे. पण दिल्लीपेक्षा मी मुंबईला प्राधान्य देऊ इच्छिते. यामागे माझ्याकडे खूप चांगलं कारण आहे. मला मुंबईत जास्त सुरक्षित वाटतं. सुरक्षेच्या बाबतीत दिल्लीत सुधारणा झाली आहे की नाही, याची मला अजून कल्पना नाही. पण मला तिथे असुरक्षित वाटतं. याचं नेमकं कारण मी सांगू शकत नाही. मला वाटत नाही की दिल्लीत अशी एकही महिला असेल जिचा विनयभंग झाला नसेल.”

सान्या दिल्लीतच लहानाची मोठी झाली. दिल्लीच्या गार्गी कॉलेजमधून तिने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचवेळी ती कंटेम्पररी आणि बॅले नृत्य शिकली आणि नंतर ‘डान्स इंडिया डान्स’च्या ऑडिशनसाठी मुंबईत आली. सान्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती ​​सध्या ‘हिट: द फर्स्ट केस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानंतर ती शाहरुख खानसोबत ‘जवान’ चित्रपटात दिसणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.