Video: रणवीर-दीपिकाचा घटस्फोट होणार? अभिनेत्याने सोडलं मौन

रणवीर-दीपिकाच्या नात्यात सर्वकाही आलबेल नाही? चर्चांदरम्यान व्हिडीओ आला समोर

Video: रणवीर-दीपिकाचा घटस्फोट होणार? अभिनेत्याने सोडलं मौन
Ranveer and DeepikaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 6:35 PM

रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही बॉलिवूडमधल्या सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऑनस्क्रीन बाजीराव आणि मस्तानी साकारणारी ही जोडी अनेकांसाठी आदर्श जोडी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. रणवीर-दीपिकाच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांना एक ट्विट कारणीभूत ठरतंय. एकीकडे सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा असताना आता दुसरीकडे रणवीरचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो दीपिकाबद्दल बोलताना दिसतोय.

चित्रपट समिक्षक उमैर संधू यांनी रणवीर-दीपिकाच्या नात्याबद्दल ट्विट केलं होतं. ‘ब्रेकिंग, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्यात काही आलबेल नाही’, असं ट्विट त्यांनी केलं. त्यानंतर चाहत्यांकडून प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. सोशल मीडियावर क्षणार्धात हा ट्विट व्हायरल झाला.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

नुकतीच दीपिकाची तब्येत ठीक नसल्याने तिला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावरुनही नेटकऱ्यांनी शंका उपस्थित केली. तर काहींनी उमैर यांच्या ट्विट पब्लिसिटी स्टंट म्हटलंय. या सर्व चर्चांदरम्यान आता रणवीरची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणवीर त्याच्या आणि दीपिकाच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “आम्ही 2012 मध्ये भेटलो होतो आणि तेव्हापासून डेटिंगला सुरुवात झाली. आमच्या नात्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत”, असं तो या मुलाखतीत म्हणताना दिसतोय. रणवीरने त्याच्या या वक्तव्यांतून नात्यातील दुराव्याच्या चर्चांना अप्रत्यक्षपणे फेटाळलं आहे.

रणवीर आणि दीपिकाने 14 नोव्हेंबर 2018 रोजी लग्नगाठ बांधली. ‘रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.