Shamshera: ‘सम्राट पृथ्वीराज’पेक्षाही कमी झाली ‘शमशेरा’ची कमाई; यशराजचा चौथा फ्लॉप चित्रपट

कमी संख्येने ओपनिंग आणि शनिवारी कमाईत झालेल्या घसरणीनंतर रविवारी चित्रपट थोडीफार चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला केवळ 31.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

Shamshera: 'सम्राट पृथ्वीराज'पेक्षाही कमी झाली 'शमशेरा'ची कमाई; यशराजचा चौथा फ्लॉप चित्रपट
Shamshera: 'सम्राट पृथ्वीराज'पेक्षाही कमी झाली 'शमशेरा'ची कमाईImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 8:22 AM

रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘शमशेरा’ (Shamshera) हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) फ्लॉप ठरतोय. रविवारीही तिकीट बारीवर हा चित्रपट कोणतीही कमाल दाखवू शकला नाही. कमी संख्येने ओपनिंग आणि शनिवारी कमाईत झालेल्या घसरणीनंतर रविवारी चित्रपट थोडीफार चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला केवळ 31.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे हा रणबीर कपूरच्या करिअरमधील आणखी एक फ्लॉप चित्रपट ठरला आहे.

रणबीर कपूरच्या चित्रपटांच्या वीकेंड कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर ‘संजू’ चित्रपटाचं नाव अग्रस्थानी येतं. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 120.06 कोटी रुपयांची कमाई केली. दीपिका पदुकोणसोबतच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 62.11 कोटी रुपयांची कमाई करून दुसरं स्थान पटकावलं आहे. दुसरीकडे ‘तमाशा’, ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘रॉकस्टार’ने अनुक्रमे 38.23 कोटी, 35,60 कोटी आणि 35 कोटी रुपयांची कमाई करून पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवलं आहे. त्याचवेळी रणबीर कपूरचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट या यादीत शेवटच्या स्थानावर आहे. शमशेरा चित्रपटाने पहिल्या वीकेंडला केवळ 31.50 कोटींची कमाई केली आहे.

रणबीर कपूरच्या चित्रपटांनी ओपनिंग वीकेंडला किती कमाई केली?

संजू- 120.06 कोटी रुपये ये जवानी है दिवानी- 62.11 कोटी रुपये तमाशा- 38.23 कोटी रुपये ऐ दिल है मुश्किल- 35.60 कोटी रुपये रॉकस्टर- 35 कोटी रुपये बेशरम- 34.37 कोटी रुपये बर्फी- 34.25 कोटी रुपये राजनिती- 34 कोटी रुपये जग्गा जासूस- 33. 17 कोटी रुपये शमशेरा- 31.50 कोटी रुपये

हे सुद्धा वाचा

या वर्षी प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैया 2’ ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’, आलिया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि वरुण धवनचा ‘जुग जुग जिओ’ने त्यांच्या पहिल्या वीकेंडला अनुक्रमे 39.40 कोटी, 39.12 कोटी आणि 36.93 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकीकडे ‘भुल भुलैया 2’ आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. दुसरीकडे, सम्राट पृथ्वीराज, बच्चन पांडे आणि जुग जुग जिओ फ्लॉप ठरले आहेत. रणबीर कपूरच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर शमशेराने या चार चित्रपटांपेक्षा कमी कमाई केली आहे.

2022 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांचं ओपनिंग वीकेंड कलेक्शन

भुल भुलैय्या 2- 55.96 कोटी रुपये सम्राट पृथ्वीराज- 39.40 कोटी रुपये गंगुबाई काठियावाडी- 39.12 कोटी रुपये जुग जुग जियो- 36.93 कोटी रुपये बच्चन पांडे- 36.17 कोटी रुपये शमशेरा- 31.50 कोटी रुपये

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.