लग्नाआधी शिबानी दांडेकरच्या टॅटूची हवा, पाहा काय खास आहे टॅटूमध्ये!
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farahan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani dandekar) पुढच्या महिन्यात लग्न बंधण्यात अडकणार आहेत. लग्नाची तयारी सुरू होण्यापूर्वी शिबानीने तिच्या हातावर एक खास टॅटू बनवला आहे. शिबानीने तिच्या इन्स्टाग्रामवर टॅटू बनवण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farahan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani dandekar) पुढच्या महिन्यात लग्न बंधण्यात अडकणार आहेत. लग्नाची तयारी सुरू होण्यापूर्वी शिबानीने तिच्या हातावर एक खास टॅटू बनवला आहे. शिबानीने तिच्या इन्स्टाग्रामवर टॅटू बनवण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. शिबानीने तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर 3 उडणाऱ्या पक्ष्यांचा टॅटू बनवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार फरहान आणि शिबानी 21 फेब्रुवारीला मुंबईत त्यांच्या लग्नाची नोंदणी करतील आणि मार्चमध्ये लग्न करणार आहेत.
शिबानीने खास टॅटू काढला
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, दोघेही लग्नाची तयारी करत आहेत. फरहान आणि शिबानी हे बॉलीवूडमधील खास कपल आहे. सध्या ओमिक्रॉन आणि कोरोनाने पुन्हा पाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे सेलिब्रिटींच्या लग्नावरही कोरोना नियमांची मर्यादा आली आहे. त्यामुळे काही मोजक्या लोकांसाठी ते रिसेप्शन ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे. विकी कौशल आणि कतरीनाचाही विवाह सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला आहे.
21 फेब्रुवारीला लग्न
लग्नासाठी पंचतारांकित हॉटेल बुक करण्यात आले आहे. कोरोनामुळे फरहान आणि शिबानी यांनी अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, शिबानी आणि फरहान लग्नात सब्यसाचीने डिझाइन केलेले पोशाख परिधान करतील. आजच्या ट्रेंडनुसार दोघांनीही पेस्टल कलरचे आउटफिट्स निवडले आहेत. त्यांचे लग्न बरेच दिवसांपासून चर्चेत आहे कारण ते बऱ्याच काळापासून प्रेमात आहेत.
संबंधित बातम्या :