Riteish Deshmukh: पायाच्या व्यायामाचे साईड इफेक्ट्स; रितेश देशमुखचा व्हिडीओ पाहून हसावं की रडावं कळेना!

इन्स्टावर फोटो आणि व्हिडीओसाठी नेहमीच विविध आणि अनोखे फिल्टर येत असतात. असाच एक फिल्टर सध्या ट्रेंडमध्ये असून विविध सेलिब्रिटी त्यावर व्हिडीओ बनवत आहेत. मग रितेशसुद्धा कसा मागे राहील?

Riteish Deshmukh: पायाच्या व्यायामाचे साईड इफेक्ट्स; रितेश देशमुखचा व्हिडीओ पाहून हसावं की रडावं कळेना!
Riteish DeshmukhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 3:35 PM

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia D’Souza) हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ते चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. कधी जिनिलिया रितेशसोबत तर कधी रितेश स्वत: मजेशीर व्हिडीओ शूट करून इन्स्टा रिल्समध्ये (Instagram Reels) ते पोस्ट करत असतो. या रिल्समध्ये एखादा नवा ट्रेंड आल्यास, ही जोडी त्या ट्रेंडनुसार व्हिडीओ करायला अजिबात चुकत नाही. असाच व्हिडीओ रितेशने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून हसावं की रडावं असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. इन्स्टावर फोटो आणि व्हिडीओसाठी नेहमीच विविध आणि अनोखे फिल्टर येत असतात. असाच एक फिल्टर सध्या ट्रेंडमध्ये असून विविध सेलिब्रिटी त्यावर व्हिडीओ बनवत आहेत. मग रितेशसुद्धा कसा मागे राहील?

हा नवा फिल्टर वापरून व्हिडीओ शूट केल्यास सामान्य व्हिडीओसुद्धा त्यानुसार वरखाली आणि वाकडा-तिकडा हलताना दिसतो. रितेशने जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ त्या मजेशीर फिल्टरमध्ये शूट करत त्याला ट्विस्ट दिला आहे. ‘पायाच्या व्यायामाचे साईड इफेक्ट्स’ असं कॅप्शन देत त्याने हा भन्नाट व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी हसण्याच्या इमोजींचा वर्षावच केला आहे. ‘हे इन्स्टाग्रामचे साईड इफेक्ट्स आहेत भाऊ’, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘ये क्या हुआ, कैसे हुआ’ गाण्याच्या ओळी दुसर्याने लिहिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा रितेशचा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

रितेशचं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

रितेश लवकरच ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार असून, त्याची पत्नी जिनिलिया या चित्रपटाची नायिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या ब्रेकनंतर जिनिलिया मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. चित्रपटात दिग्दर्शनासोबतच रितेश अभिनयाची जबाबदारीही सांभाळणार आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री जिया शंकर देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. पती-पत्नीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.