Lucky Ali: ‘आय लव्ह उद्धव, विषय कट’; गायक लकी अलीची पोस्ट व्हायरल

शिंदे आणि ठाकरे गटाबद्दल सोशल मीडियावर विविध मतं व्यक्त केली जात आहेत. अशातच प्रसिद्ध गायक लकी अलीची (Lucky Ali) फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. लकी अलीने पहिल्यांदाच अशा पद्धतीची भूमिका मांडल्याने सोशल मीडियावर त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.

Lucky Ali: 'आय लव्ह उद्धव, विषय कट'; गायक लकी अलीची पोस्ट व्हायरल
Lucky Ali and Uddhav ThackerayImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 3:12 PM

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार एकीकडे संकटात आलं आहे. तर दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटाबद्दल सोशल मीडियावर विविध मतं व्यक्त केली जात आहेत. अशातच प्रसिद्ध गायक लकी अलीची (Lucky Ali) फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. लकी अलीने पहिल्यांदाच अशा पद्धतीची भूमिका मांडल्याने सोशल मीडियावर त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे. ‘आय लव्ह उद्धव (Uddhav Thackeray) आणि मी त्यांच्या कुशल राजकारणाचा आदर करतो, पूर्णविराम’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

लकी अली यांची फेसबुक पोस्ट-

‘मित्रांनो, जसं तुम्ही त्यांच्या संगीताचा आदर करता तसंच त्यांच्या मताचाही आदर करा. आपण त्यांच्या मताशी सहमत असणं आवश्यक नाही, परंतु आपण त्यांचा आदर करणं आवश्यक आहे,’ असं एका युजरने लिहिलंय. तर तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘तुमचा चाहता म्हणून मी तुमचा खूप आदर करतो, पण यावेळी मी तुमच्या मताशी सहमत नाही’, असंही एका युजरने लिहिलं आहे. लकी अली यांच्या या पोस्टवरून कमेंट सेक्शनमध्ये दोन गट पडले आहेत. काहीजण उद्धव ठाकरेंचं समर्थन करतायत तर काहींनी लकी अलीच्या मताला विरोध केला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार संकटात आलं असताना आता पुढे नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सर्वसामान्यांसह काही सेलिब्रिटीसुद्धा या राजकीय घडामोडींबाबत सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. महाविकास आघाडीतून बाहेर पडणं आवश्यक असल्याचं कारण सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मंगळवारी बंडाचा झेंडाचा पुकारला. काही आमदारांना घेऊन ते आधी सुरतला गेले आणि तिथून बुधवारी गुवाहाटीला गेले. बुधवारपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन दाखल होणाऱ्या शिवसेना आणि अपक्ष आमदारांची संख्या वाढू लागली. मंगळवारी शिवसेनेसोबत असलेले आमदार हळूहळू गुवाहाटीला जाऊ लागले.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.