Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाने गुपचूप उरकला साखरपुडा? कोण आहे तिच्या फोटोतील ‘मिस्ट्री मॅन’

सोनाक्षीची अंगठी, फोटोतील मिस्ट्री मॅन (mystery man) आणि या फोटोंचं कॅप्शन या सर्व गोष्टींमुळे ती लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी सांगणार असल्याचं म्हटलं जातंय.

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाने गुपचूप उरकला साखरपुडा? कोण आहे तिच्या फोटोतील 'मिस्ट्री मॅन'
Sonakshi SinhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 1:41 PM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले असून सध्या त्या फोटोंचीच जोरदार चर्चा आहे. या फोटोंमध्ये सोनाक्षीसोबत असलेला मिस्ट्री मॅन कोण आहे, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. विशेष म्हणजे सोनाक्षीच्या बोटातही डायमंडची अंगठी दिसत असल्याने तिने गुपचूप साखरपुडा उरकला की काय, असाही अंदाज वर्तवला जात आहे. सोनाक्षीची अंगठी, फोटोतील मिस्ट्री मॅन (mystery man) आणि या फोटोंचं कॅप्शन या सर्व गोष्टींमुळे ती लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी सांगणार असल्याचं म्हटलं जातंय. सोनाक्षीने तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी (Zaheer Iqbal) साखरपुडा केला असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.

सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीन फोटो पोस्ट केले आहेत. या तिन्ही फोटोंना तिने एकच कॅप्शन दिलं आहे. ‘माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. माझ्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण होत आहे आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. मला अजूनही विश्वास बसत नाहीये’, असं तिने लिहिलंय. यातील एका फोटोमध्ये तिने त्या मिस्ट्री मॅनचा हात धरला आहे. मात्र त्याचा चेहरा त्यात दिसत नाहीये. दुसऱ्या फोटोमध्ये सोनाक्षीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे. तर तिसऱ्या फोटोंमध्ये सोनाक्षी तिच्या बोटातील अंगठी दाखवताना दिसतेय.

हे सुद्धा वाचा

पहा तिचे फोटो-

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षीने कॅप्शनमध्ये शेवटी EZI असं लिहिल्याने अनेकांनी झहीर इक्बालच्या नावाचा अंदाज वर्तवला आहे. ‘EZI म्हणजे झहीर इक्बाल का?’, असा प्रश्न एकाने विचारला. तर दुसऱ्याने लिहिलं, ‘EZI: E म्हणजे Engagement, Z म्हणजे Zaheer आणि I म्हणजे Iqbal.’ काहींनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

सोनाक्षी आणि झहीर या दोघांनीही सलमान खानच्या प्रोजेक्टमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोनाक्षीने 2020 मध्ये ‘दबंग’ या चित्रपटातून पदार्पण केलं, तर झहीरने 2019 मध्ये ‘नोटबुक’ या चित्रपटातून पदार्पण केलं.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.