Swayamvar – Mika Di Vohti: ‘स्वयंवर’मध्ये मिका सिंग कोणाच्या गळ्यात घालणार वरमाळा? टॉप-3 पैकी कोण मारणार बाजी?

प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) अखेर लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास 100-150 मुलींची स्थळं नाकारल्यानंतर मिका सिंगला त्याची जीवनसाथी सापडली आहे. त्याने 12-15 स्पर्धकांच्या यादीतून टॉप 3 मुलींची निवड केली आहे.

Swayamvar - Mika Di Vohti: 'स्वयंवर'मध्ये मिका सिंग कोणाच्या गळ्यात घालणार वरमाळा? टॉप-3 पैकी कोण मारणार बाजी?
Mika SinghImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 25, 2022 | 11:01 AM

प्रसिद्ध गायक मिका सिंग (Mika Singh) अखेर लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास 100-150 मुलींची स्थळं नाकारल्यानंतर मिका सिंगला त्याची जीवनसाथी सापडली आहे. त्याने 12-15 स्पर्धकांच्या यादीतून टॉप 3 मुलींची निवड केली आहे. आता त्यापैकी एकीशी तो लग्न करणार आहे. स्टार भारतवर 19 जूनपासून हा शो सुरू झाला. ‘स्वयंवर: मिका दी वोटी’चा (Swayamvar Mika Di Vohti) ग्रँड फिनाले (Grand Finale) आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रतन राजपूत, राहुल महाजन आणि राखी सावंत यांच्यानंतर मिका सिंगनेही ‘स्वयंवर’ आयोजित केला. रतन, राहुल आणि राखी यांचा स्वयंवर मात्र यशस्वी झाला नाही, पण आता सर्वांच्या नजरा मिकावर खिळल्या आहेत. अंतिम फेरीत पोहोचलेल्या तिघींपैकी मिका कोणाशी लग्न करेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मिकाने निवडलेल्या टॉप 3 मुली कोण आहेत, ते पाहुयात..

प्रणितिका दास – ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ‘सदा नी प्रेमालो’ या तेलुगू चित्रपटातून तिने पदार्पण केलं. तिचा जन्म 14 जानेवारी 1999 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात झाला. तिथेच तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं. बीसीएची पदवी तिने घेतली. प्रणितिकाला नृत्य, गाणं आणि प्रवासाची आवड आहे. शालेय जीवनात तिने भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं. तर कॉलेजमध्ये असताना तिने ‘मिस फ्रेशर’चा किताबही पटकावला आहे. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापासून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने अनेक सौंदर्यस्पर्धांमध्येही भाग घेतला होता.

हे सुद्धा वाचा

नीत महल – नीत महलचं पूर्ण नाव नीत कौर महल आहे. तीसुद्धा अभिनेत्री आणि मॉडेल आहे. नीतचा जन्म 29 जुलै 1994 रोजी चंदीगडमध्ये झाला. तिने पंजाब विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं आहे. प्रवास करणं, जिमला जाणं, शॉपिंग करणं आणि गाणी ऐकणं तिला आवडतं. 2016 मध्ये ती ‘कमली यार दी’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. पंजाबी गायक लखविंदर वडाली याने ते गाणं गायलं होतं. याशिवाय नीत इतर अनेक पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. याशिवाय नीतने पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत काम केलं आहे. ‘तख्तगढ’ (2022), ‘दुल्ला व्हॅली’ आणि ‘हाय एंड यारियाँ’ यांसारख्या पंजाबी चित्रपटात तिने काम केलं.

पहा फोटो-

आकांक्षा पुरी – आकांक्षासुद्धा अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2015 मध्ये आलेल्या ‘कॅलेंडर गर्ल’ या चित्रपटात नंदिता मेननची भूमिका साकारून तिने लोकप्रियता मिळवली. ती मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची आहे. भोलाल इथून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिचा जन्म 26 जुलै 1988 रोजी झाला. तिने ‘बिग बॉस 13’ फेम पारस छाबराला डेट केलं होतं. पण या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. आकांक्षाचे वडील आरके पुरी हे निवृत्त एसीपी आहेत. तर आई चित्रा पुरी ज्योतिषी आहे. आकांक्षाने विजय माल्ल्याच्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’मध्ये आंतरराष्ट्रीय केबिन क्रू म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिला तिचं करिअर हॉस्पिटॅलिटीमध्ये करायचं होतं. पण नंतर तिला एका तमिळ चित्रपटात काम करण्याची ऑफर आली, म्हणून ती चित्रपटसृष्टीकडे वळली.

मिका सिंगचा ‘स्वयंवर’

‘स्वयंवर: मिका दी वोटी’ या शोला आता एका महिन्याहून अधिक काळ झाला आहे. त्याचा ग्रँड फिनाले आज (25 जुलै) आहे. रात्री 8 वाजता स्टार भारतवर हा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना पाहता येईल. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टार’चं सबस्क्रिप्शन असल्यास तिथेही तुम्ही तो पाहू शकता.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...