Video: तब्बूचे केस ओढले, तिला हवेत लटकवलं.. ‘भुल भुलैय्या 2’ची पडद्यामागील दृश्ये पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

टी सीरिजकडून त्यांच्या युट्यूब चॅनलवर तब्बूच्या शूटिंगची पडद्यामागील दृश्ये व्हिडीओच्या स्वरुपात पोस्ट करण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या घराण्याची साधी सून आणि सर्वांना घाबरवून सोडणारी आत्मा अशा दोन्ही भूमिकांची तयारी तिने कशी केली, हे दाखवण्यात आलं आहे.

Video: तब्बूचे केस ओढले, तिला हवेत लटकवलं.. 'भुल भुलैय्या 2'ची पडद्यामागील दृश्ये पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Tabu in Bhool Bhulaiyaa 2Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 9:11 AM

‘भुल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल, त्यांना तब्बूच्या (Tabu) दुहेरी भूमिका पाहून आश्चर्याचा धक्का बसलाच असेल. अंजुलिका आणि मंजुलिका अशा दोन भूमिका तिने मोठ्या पडद्यावर अगदी सहजरित्या साकारल्या. विशेष म्हणजे, आजवर करिअरमध्ये कधीच न साकारलेली भूमिका तिने या चित्रपटात अत्यंत दमदार साकारली. टी सीरिजकडून त्यांच्या युट्यूब चॅनलवर तब्बूच्या शूटिंगची पडद्यामागील दृश्ये व्हिडीओच्या स्वरुपात पोस्ट करण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या घराण्याची सोज्वळ सून आणि सर्वांना घाबरवून सोडणारी आत्मा अशा दोन्ही भूमिकांची तयारी तिने कशी केली, हे दाखवण्यात आलं आहे. अनीस बाजमी (Anees Bazmi) दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवणी आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका आहेत.

या भूमिकेबद्दल तब्बू म्हणाली, “जवळपास अडीच वर्षांपूर्वी दिग्दर्शक अनीसने मला एका ओळीत सांगितलं होतं की तब्बू तुला दुहेरी भूमिका साकारायच्या आहेत, एक चांगली आणि एक वाईट. मी त्यावेळी त्यांना सहज ओके म्हणाले होते.” युट्यूबवरील या ‘बिहाईंड द सीन्स’ व्हिडीओमध्ये तब्बू मंजुलिका म्हणून तयार झाल्यानंतर सेटवरील सर्वांना घाबरवताना आणि हसवताना पहायला मिळतेय.

हे सुद्धा वाचा

चित्रपटातील एका सीनमध्ये मंजुलिकाची आत्मा तब्बूचे केस पकडून तिला ओढू लागते आणि तिला भिंतीवर आदळते. ही दृश्ये कशी चित्रित केली गेली, हेसुद्धा यात पहायला मिळतंय. हार्नेसच्या मदतीने तब्बूची नकारात्मक भूमिकेची काही दृश्ये चित्रित केली गेली आहेत. “माझ्यासाठी हा नवीन अनुभव होता, पण हे सर्व तितकंच उत्कंठावर्धक होतं. हार्नेसवर राहून शूटिंग करणं थोडं अवघड होतं”, असं ती म्हणाली. ‘भुल भुलैय्या 2’ने बॉक्स ऑफिसवर कमाईचा 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या’चा हा सीक्वेल आहे. मूळ चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.