नोरा फतेहीला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर कोरिओग्राफर टेरेन्सने सोडलं मौन; म्हणाला “राज की बात..”

'इंडियाज बेस्ट डान्सर' या रिॲलिटी शोमध्ये परीक्षक असलेल्या मलायका अरोराला जेव्हा कोरोनाची लागण झाली तेव्हा तिच्या जागी नोरा फतेहीची (Nora Fatehi) एण्ट्री झाली. यावेळी टेरेन्स आणि नोरा यांच्यात चांगली मैत्री झाली.

नोरा फतेहीला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर कोरिओग्राफर टेरेन्सने सोडलं मौन; म्हणाला राज की बात..
Terence Lewis and Nora FatehiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 12:36 PM

कोरिओग्राफ टेरेन्स लुईस (Terence Lewis) आणि अभिनेत्री, मॉडेल नोरा फतेही (Nora Fatehi) हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ (India’s Best Dancer) या रिॲलिटी शोच्या मंचावर या दोघांची भेट झाली. दोघंही उत्तम डान्सर्स असून त्यांची केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडायची. टेरेन्स त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारसं कधी व्यक्त होत नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने नोराला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं. आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या या मुलाखतीत टेरेन्स त्याच्या आणि नोराच्या मैत्रीबाबत, नात्याबाबत व्यक्त झाला. नोरा फतेही ही मूळची कॅनेडियन डान्सर आहे. तसंच तिने मॉडेलिंगदेखील केलं आहे. नोराने हिंदी, तेलगू, मल्याळम आणि तमिळ भाषांमधल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिची ‘ओ साकी-साकी’, ‘कुसु- कुसु’, ‘छोड देंगे’, ‘एक तो कम है जवानी’ ही गाणी सुपरहिट झाली.

काय म्हणाला टेरेन्स?

“राज की बात राज रहने दो (जे गुपित आहे ते तसंच राहू द्या). मी तुम्हाला ऑफ कॅमेरा याचं उत्तर देईन. मला असं वाटतं ऑन स्क्रीन आमची केमिस्ट्री खूप चांगली आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, ती खूप मोकळ्या मनाची आहे. मला तिची एनर्जी आणि व्हाइब खूप आवडते. ती स्वत: उत्तम डान्सर आहे त्यामुळे तिला या गोष्टी माहीत आहेत. ती अत्यंत मेहनती कलाकार आहे. आमचं हेल्थी रिलेशनशिप आहे”, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

या मुलाखतीत टेरेन्स त्याच्या डेटिंग लाइफबद्दलही व्यक्त झाला. कमिटमेंटला घाबरत असल्याचं त्याने स्पष्टपणे सांगितलं. “माझ्यावर कोणी हक्क गाजवलेलं मला अजिबात आवडत नाही आणि इतरांच्या बाबतीत मीसुद्धा हीच गोष्ट ध्यानात ठेवून वागतो. खरं प्रेम हे मुक्त असतं. कोणीच तुम्हाला पूर्ण करू शकत नाही”, असं तो पुढे म्हणाला.

‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या रिॲलिटी शोमध्ये परीक्षक असलेल्या मलायका अरोराला जेव्हा कोरोनाची लागण झाली तेव्हा तिच्या जागी नोरा फतेहीची एण्ट्री झाली. यावेळी टेरेन्स आणि नोरा यांच्यात चांगली मैत्री झाली. त्याआधी नोरा ही गायक गुरू रंधावाला डेट करत असल्याचीही चर्चा होती. या दोघांचा ‘डान्स मेरी रानी’ हा म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. त्यावेळी डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.