B Praak: जन्म होताच बाळाने गमावला जीव; ‘तेरी मिट्टी’ फेम गायक बी प्राकने लिहिली भावूक पोस्ट

बी प्राकची पत्नी मीराने या वर्षी एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली होती. 4 एप्रिल 2019 मध्ये बी प्राक आणि मीराने लग्नगाठ बांधली.

B Praak: जन्म होताच बाळाने गमावला जीव; 'तेरी मिट्टी' फेम गायक बी प्राकने लिहिली भावूक पोस्ट
B PraakImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 10:34 AM

‘केसरी’ या चित्रपटात ‘तेरी मिट्टी’ (Teri Mitti) हे लोकप्रिय गाणं गाणारा गायक बी प्राकच्या (B Praak) आयुष्यात अत्यंत दु:खद घटना घडली आहे. प्राकची पत्नी मीरा बच्चन (Meera Bachan) हिने नुकताच बाळाला जन्म दिला. मात्र जन्म होताच त्या बाळाने आपला जीव गमावला. प्राकने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. “अत्यंत दु:खद मनाने आम्हाला हे सांगावं लागतंय की आमच्या नवजात बाळाने जन्म होताच आपले प्राण गमावले. हा आमच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी काळ आहे”, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय. त्याचप्रमाणे या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करा, अशीही विनंती त्याने चाहत्यांना केली आहे.

बी प्राकची पोस्ट-

“जड अंत:करणाने मला हे सांगावं लागतंय की आमच्या नवजात बाळाने जन्म होताच आपले प्राण गमावले. पालक म्हणून हा आमच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायी काळ आहे. आम्ही सर्व डॉक्टर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. त्याने शेवटपर्यंत खूप प्रयत्न केले आणि आमची साथ दिली. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे आणि या कठीण काळात तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. तुमचेच मीरा आणि बी प्राक”, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

बी प्राकच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘तुमच्यासाठी प्रार्थना करतो’, असं गायिका नीती मोहनने लिहिलं. तर ‘तुम्हा दोघांसाठी मी प्रार्थना करते. मीराच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला होत असलेल्या दु:खाची कल्पनासुद्धा मी करू शकत नाही’, असं लिसा मिश्राने म्हटलंय. गौतम गुलाटी, अॅमी वर्क, गौहर खान यांसारख्या सेलिब्रिटींनी त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.

बी प्राकची पत्नी मीराने या वर्षी एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली होती. 4 एप्रिल 2019 मध्ये बी प्राक आणि मीराने लग्नगाठ बांधली. तर 2020 मध्ये मीराने मुलाला जन्म दिला. बी प्राकचं खरं नाव प्रतीक बच्चन असं आहे. त्याने अनेक हिंदी आणि पंजाबी गाणी गायली आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.