इंदिरा गांधींनी खलिस्तानींना मच्छरासारखं चिरडलं, कंगनाच्या विधानाने अकाली दल भडकली; गुन्हा दाखल

कंगना राणौतने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेले विधान अजूनही गाजतच आहे. त्यानंतर तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाचा पारा चांगलाच चढला असून ती सोशल मीडियावर याबद्दलच्या अनेक पोस्ट शेअर करत आहे. मात्र, आता यासर्व प्रकरणात कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

इंदिरा गांधींनी खलिस्तानींना मच्छरासारखं चिरडलं, कंगनाच्या विधानाने अकाली दल भडकली; गुन्हा दाखल
कंगना रनौत
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 12:08 PM

मुंबई : कंगना राणौतने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेले विधान अजूनही गाजतच आहे. त्यानंतर तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर कंगनाचा पारा चांगलाच चढला असून ती सोशल मीडियावर याबद्दलच्या अनेक पोस्ट शेअर करत आहे. मात्र, आता यासर्व प्रकरणात कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनाच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

शीख समाजाचा अपमान केल्याचा आरोप

इंदिरा गांधींनी खलिस्तानींना मच्छरासारखं चिरडलं असेही कंगनाने आपल्याला पोस्टमध्ये म्हटंले आहे. कंगनाच्या विधानाने अकाली दल भडकले आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. इंस्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कंगना विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. समितीने जारी केलेल्या निवेदनानुसार, कंगनाच्या विरोधात ही तक्रार मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात सायबर सेलमध्ये नोंदवण्यात आली आहे.

कमिटीच्या लोकांचे म्हणणे आहे की, कंगनाने सर्वप्रथम शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी आंदोलन असे जाणीवपूर्वक म्हटंले होते आणि त्यानंतर तिने शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरली आहे. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने म्हटले आहे की, “शीख समुदायाच्या भावना दुखावण्याच्या गुन्हेगारी हेतूने ही पोस्ट जाणूनबुजून तयार करण्यात आली होती आणि ती शेअर करण्यात आली होती.

कंगना भडकली

कृषीविषयक तीनही कायदे मागे घेतल्यावर नाराजी व्यक्त करत कंगनाने लिहिले होते की, ‘दुःखद, लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचे… संसदेत बसलेल्या सरकारऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागले, तर तेही जिहादी आहे. हा देश आहे… ज्यांना हे हवे आहे त्या सर्वांचे अभिनंदन.’कंगनाने आनंद रंगनाथन यांचे ट्विट तिच्या स्टोरीवर शेअर केले होते.

शेतकर्‍यांना दहशतवादी म्हटले होते

यापूर्वी कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ कंगनाने शेतकर्‍यांना दहशतवादीही म्हटले होते. तिने लिहिलं होतं की, ‘पंतप्रधान, झोपलेल्याला उठवता येईल, गैरसमज असलेल्याला समजावता येईल, पण जो झोपला आहे, मुर्खासारखं वागतोय त्याला तुमच्या स्पष्टीकरणाचा काय फरक पडणार आहे? हे तेच दहशतवादी आहेत, CAA ने एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गमावले नाही, परंतु त्यांनी रक्ताचे पाट वाहिले आहेत.’

संबंधित बातम्या : 

Lal Singh Chaddha | अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

‘आर्याने माझे आयुष्य बदलले!’, ‘आर्या’चा नवा सीझन प्रदर्शित होण्यापूर्वी सुष्मिता सेनने व्यक्त केल्या भावना!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.