Chup Revenge of the Artist | सनी देओलच्या ‘चूप’ चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला, या दिवशी चित्रपट होणार रिलीज
मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटातून अमिताभ बच्चन संगीतकार म्हणून पदार्पण करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर. बाल्की यांनी सांगितले की, या चित्रपटाद्वारे बिग बी त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहेत.
मुंबई : चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट (Chup: Revenge of the Artist) या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणारयं. सनी देओल आणि साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान यांचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहात आहेत. सनी देओलने (Sunny Deol) याबद्दल स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिलीयं. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आर. बाल्की आहेत. हा चित्रपट ज्येष्ठ अभिनेते गुरु दत्त यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढलीयं. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर चित्रपटासंबधीत (Movie) अजून काही अपडेट पुढे येऊ शकतात.
चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला
विशेष म्हणजे चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट या चित्रपटाचा ट्रेलर उद्या 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सनी देओलने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करताना ही माहिती दिलीयं. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करताना लिहिले की, येत आहे…येत आहे… या चित्रपटाचा ट्रेलर उद्या रिलीज होतोय, यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह वाढलायं. हा चित्रपट या महिन्यात 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सस्पेन्स कायम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटातून अमिताभ बच्चन संगीतकार म्हणून पदार्पण करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर. बाल्की यांनी सांगितले की, या चित्रपटाद्वारे बिग बी त्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहेत. चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट या चित्रपटातून अमिताभ बच्चन संगीतकार म्हणून नव्या प्रवासाला सुरूवात करतायंत. मात्र, या चित्रपटासंदर्भात कमालीचा सस्पेन्स ठेवल्याचे स्पष्ट दिसते आहे.