Movies: ऑगस्टमध्ये सिनेप्रेमींसाठी मोठी मेजवानी; पहा कोणकोणते चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या महिन्यात अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ज्याची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. आमिर खान 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटातून चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

Movies: ऑगस्टमध्ये सिनेप्रेमींसाठी मोठी मेजवानी; पहा कोणकोणते चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
August Movie Release: ऑगस्टमध्ये सिनेप्रेमींसाठी मोठी मेजवानीImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 10:09 AM

चित्रपटप्रेमींसाठी ऑगस्ट (August) महिना खूप खास असणार आहे, कारण त्यांना या महिन्यात असे अनेक चित्रपट पाहायला मिळणार आहेत जे केवळ उत्तमच नाहीत तर पडद्यावर त्यांची इतर चित्रपटांशी स्पर्धाही पाहायला मिळणार आहे. या महिन्यात अनेक बड्या स्टार्सचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत, ज्याची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटातून चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तर अक्षय कुमारही त्याच्या ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) या चित्रपटातून आमिरला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. तर पाहुयात, या महिन्यात इतर कोणकोणते चित्रपट प्रदर्शित होणार आहेत..

सीता रामम

कधी प्रदर्शित होणार?- 5 ऑगस्ट मृणाल ठाकूरचा ‘सीता रामम’ हा बहुभाषिक चित्रपट आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर व्यतिरिक्त दल्कर सलमान, रश्मिका मंदाना आणि सुमंत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हनु राघवपुडी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा एक अॅक्शन रोमान्स चित्रपट असल्याचं सांगण्यात येत आहे. दल्कर सलमानने या चित्रपटात लेफ्टनंट रामची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट केवळ हिंदीतच नाही तर इतर भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

हे सुद्धा वाचा

नर का सुर

कधी प्रदर्शित होणार?- 5 ऑगस्ट हा चित्रपट उत्तर प्रदेशातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की 12 महिला त्यांच्या हक्कांसाठी लढतात, पण त्यांच्या या लढ्यात अनेक अडथळे येतात. अनेकजण त्यांना धमक्या देतात आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु शेवटी ते त्यांचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी ठरतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुलदीप कौशिक यांनी केलं असून त्याचं लेखनही त्यांनीच केलं आहे. या चित्रपटात ललित परिमू, मन्नत सिंग आणि दीक्षा मान सारखे कलाकार दिसणार आहेत.

हरियाणा

कधी प्रदर्शित होणार?- 5 ऑगस्ट हा चित्रपट तीन भावांच्या कथेवर आधारित आहे. या रंजक कथेत तीन भाऊ प्रेमात पडल्यानंतर पुढचा प्रवास सुरू होतो, जो खूपच मनोरंजक आहे. या चित्रपटात यश टोंक, अश्लेषा सावंत आणि मोनिका शर्मासारखे स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट 5 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

मियामी से न्यूयॉर्क

कधी प्रदर्शित होणार?- 5 ऑगस्ट ‘मियामी से न्यूयॉर्क’ हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जॉय ऑस्टिन यांनी केलं आहे. या चित्रपटात निहाना मिनाज, निखार कृष्णानी आणि रोहिणी चंद्र जैनाल लाकल या कलाकारांच्या भूमिका आहेत.

लाल सिंग चड्ढा

कधी प्रदर्शित होणार?- 11 ऑगस्ट आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपट निर्मातेही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे.

रक्षाबंधन

कधी प्रदर्शित होणार?- 11 ऑगस्ट यावर्षी अक्षय कुमारचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही. मात्र तो पुन्हा एकदा आणखी एका चित्रपटासह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. आतापर्यंत त्याचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. अक्षयचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. मात्र या चित्रपटाला अपेक्षित यश मिळेल की नाही हे रिलीजनंतरच कळेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं आहे.

कार्तिकेय 2

कधी प्रदर्शित होणार?- 12 ऑगस्ट या चित्रपटात निखिल सिद्धार्थ, अनुपमा परमेश्वरन, आदित्य मेनन, अनुपम खेर आणि हर्षा चेमुडू यांसारखे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन चंदू मोंडेटी यांनी केलं आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

यशोदा

कधी प्रदर्शित होणार?- 12 ऑगस्ट समंथा रुथ प्रभूचा यशोदा हा चित्रपट 12 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समंथाशिवाय उन्नी मुकुंदन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हरेश नारायण यांनी केलं आहे.

दोबारा

कधी प्रदर्शित होणार?- 19 ऑगस्ट तापसी पन्नूचा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे. हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला आहे. या मिस्ट्री ड्रामा चित्रपटात प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळणार आहेत.

लायगर

कधी प्रदर्शित होणार?- 25 ऑगस्ट प्रेक्षक विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे दिसणार आहे. पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. करण जोहर निर्मित हा स्पोर्ट्स ड्रामा आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.