Urvashi Rautela: दोन बायका, चार मुलं असलेल्या प्रसिद्ध गायकने लग्नासाठी केलं होतं प्रपोज; उर्वशी रौतेलाचा खुलासा

उर्वशीच्या या प्रस्तावाबद्दल कळताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गायकाबाबत अंदाज बांधण्यास सुरुवात केली. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने इजिप्शियन गायकाचं नाव लिहिलं आहे.

Urvashi Rautela: दोन बायका, चार मुलं असलेल्या प्रसिद्ध गायकने लग्नासाठी केलं होतं प्रपोज; उर्वशी रौतेलाचा खुलासा
Urvashi Rautela: दोन बायका, चार मुलं असलेल्या प्रसिद्ध गायकने लग्नासाठी केलं होतं प्रपोजImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 5:00 PM

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिची गणना सध्याच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिच्या आकर्षक लूकचे आणि फॅशनचे असंख्य चाहते आहेत. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान उर्वशीने तिला आलेल्या एका लग्नाच्या प्रस्तावाचा (Marriage Proposal) खुलासा केला. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा तिला विचारण्यात आलं की तिला कधी लग्नाचा विचित्र प्रस्ताव आला आहे का? यावर उर्वशीने होकारार्थी उत्तर दिलं. इजिप्तमधील एका प्रसिद्ध गायकने (Egyptian singer) तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं, असं तिने सांगितलं. पण तिने साफ नकार दिला होता. उर्वशीने नकारामागचं कारणसुद्धा सांगितलं.

“आमच्यात सांस्कृतिकदृष्ट्या खूप फरक आहे, त्यामुळे मला तो प्रस्ताव नाकारावा लागला. शिवाय त्या गायकाला दोन बायका आणि चार मुलं आहेत,” असं ती म्हणाली. लग्नाच्या निर्णयाबाबत तिने पुढे सांगितलं, “मला अशा अनेक प्रस्तावांना सामोरं जावं लागलं आहे, परंतु अशा मोठ्या निर्णयांसाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. विशेषतः महिलांना खूप विचार करावा लागतो. कारण ते तितकं सोपं नसतं.” या मुलाखतीत तिने लग्नाचा प्रस्ताव देणाऱ्या त्या गायकाचं नाव मात्र उघड केलं नाही. परंतु तो इजिप्तचा आहे आणि दुबईमध्ये तिला भेटला होता, असं तिने म्हटलं.

हे सुद्धा वाचा

उर्वशीच्या या प्रस्तावाबद्दल कळताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गायकाबाबत अंदाज बांधण्यास सुरुवात केली. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने इजिप्शियन गायक मोहम्मद रमजानचं नाव लिहिलं आहे. उर्वशी 2021 मध्ये या गायकासोबत एका आंतरराष्ट्रीय संगीत व्हिडिओमध्ये दिसली आहे. व्हर्सेस बेबी असं या गाण्याचं नाव होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.