Vikram Vedha: मोठ्या पडद्यावर हृतिक-सैफची टक्कर; ‘विक्रम वेधा’चा ॲक्शन-पॅक्ड टीझर पाहिलात का?

कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) गँगस्टर वेधाला (हृतिक रोशन) पकडतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो.

Vikram Vedha: मोठ्या पडद्यावर हृतिक-सैफची टक्कर; 'विक्रम वेधा'चा ॲक्शन-पॅक्ड टीझर पाहिलात का?
Vikram Vedha: मोठ्या पडद्यावर हृतिक-सैफची टक्करImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 12:40 PM

अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात वेधाच्या भूमिकेत हृतिक आहे, तर सैफ हा विक्रमची भूमिका साकारत आहे. जवळपास दोन मिनिटांचा हा टीझर ‘विक्रम वेधा’च्या विश्वाची सफर घडवणारा आहे. दमदार संवाद, अ‍ॅक्शन सीक्वेन्सचा भरणा, आकर्षक पार्श्वसंगीत आणि खिळवून ठेवणाऱ्या नाट्याने परिपूर्ण असा हा टीझर आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं एक पूर्ण पॅकेज असल्याचं संकेत देणारा हा टीझर असून त्याला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. पुष्कर-गायत्री दिग्दर्शित हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘विक्रम वेधा’ या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे. ‘विक्रम वेधा’चं कथानक नाट्यमय वळणांनी भरलेलं आहे. कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) गँगस्टर वेधाला (हृतिक रोशन) पकडतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो. वेधा आपली कथा सांगत असताना विविध पैलू उलगडत जातात आणि विक्रमला वास्तवतेचं दर्शन घडतं.

पहा टीझर-

हे सुद्धा वाचा

गुलशन कुमार, टी-सिरीज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॅाट स्टुडिओज प्रॉडक्शनच्या संयुक्त विद्यमाने ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रस्तुत केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केलं असून निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.