Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नावरील हे भन्नाट मीम्स एकदा पहाच; पोट धरून हसाल!

ट्विटरवर रणबीर-आलियाच्या लग्नावरून विविध मीम्ससुद्धा (Memes) व्हायरल होत आहेत. रणबीरच्या चाहत्यांची या लग्नाबाबत काय प्रतिक्रिया असेल, हे मीम्सच्या माध्यमातून गमतीशीरपणे सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नावरील हे भन्नाट मीम्स एकदा पहाच; पोट धरून हसाल!
Memes on Ranbir Alia weddingImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 1:09 PM

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. 13 ते 17 एप्रिलदरम्यान हे दोघं लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील चेंबूर इथल्या आर.के. बंगल्यावरच रणबीर-आलिया लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय. या दोघांनी अद्याप लग्नाविषयीची कोणतीही माहिती दिली नसली तरी सोशल मीडियावर त्याविषयी चांगलीच चर्चा सुरू आहे. इतकंच नव्हे तर ट्विटरवर रणबीर-आलियाच्या लग्नावरून विविध मीम्ससुद्धा (Memes) व्हायरल होत आहेत. रणबीरच्या चाहत्यांची या लग्नाबाबत काय प्रतिक्रिया असेल, हे मीम्सच्या माध्यमातून गमतीशीरपणे सांगण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा हा लग्नसोहळा असेल. या लग्नसोहळ्याला मोजके कुटुंबीय आणि जवळचे मित्रमैत्रिणी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. रणबीर-आलियाने अनेकदा माध्यमांसमोरही खुलेपणाने एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे. आता ही जोडी लवकरच आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. या दोघांच्या कुटुंबीयांनीही लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्याचं समजतंय. रणबीरचे आईवडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचंही लग्न आर.के. बंगल्यामध्ये झालं होतं. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंगचा पर्याय न अवलंबता कपूर कुटुंबीयांनी आर. के. बंगल्यालाच पसंती दिली आहे.

पहा मीम्स-

या लग्नसोहळ्याला अयान मुखर्जी, करण जोहर, आदित्य रॉय कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण उपस्थित असणार असल्याचंही कळतंय. रणबीर-आलियाने नुकतंच त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. त्यानंतरच्या प्रोजेक्ट्ससाठी होणाऱ्या शूटिंगच्या तारखाही त्यांनी लग्नसोहळ्याच्या हिशोबाने ठरवल्या असल्याचं समजतंय. नीतू कपूर यांनी नुकतीच सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या स्टोअरला भेट दिली. त्यामुळे लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा:

Ranbir Alia: “मै थोडी ना कम हूँ”; रणबीरच्या अफेअर्सविषयी आलियाची रोखठोक प्रतिक्रिया

Anshuman Vichare: एप्रिल फूल करणं पडलं महागात; अखेर अंशुमन विचारेच्या पत्नीने मागितली माफी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.