‘एक सणाचं गाणं’, झुंडमधल्या आंबेडकर जयंतीच्या गाण्यावर गणेश मतकरींचं वक्तव्य, वाचा चर्चेतल्या पोस्टमधले 5 मोठे मुद्दे

नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) 'झुंड' (Jhund) या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी चित्रपटातील ठराविक मुद्द्यांना घेऊन टीका केली आहे. त्यातच आता लेखक आणि समीक्षक गणेश मतकरी (Ganesh Matkari) यांच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

'एक सणाचं गाणं', झुंडमधल्या आंबेडकर जयंतीच्या गाण्यावर गणेश मतकरींचं वक्तव्य, वाचा चर्चेतल्या पोस्टमधले 5 मोठे मुद्दे
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 4:30 PM

नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी चित्रपटातील ठराविक मुद्द्यांना घेऊन टीका केली आहे. त्यातच आता लेखक आणि समीक्षक गणेश मतकरी (Ganesh Matkari) यांच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘झुंड कोणाचा आहे, कोणासाठी आहे, तो चालायला हवा की नको, साडेतीन टक्के आणि बहुजन यांमधला वाद, तो न पाहताच पहावा की नाही याबद्दल केलेल्या चर्चा, अशा अनेक अनावश्यक गोष्टी मधे आणत या चित्रपटाकडे पाहतो आहोत. यामुळे आपलं महत्वाच्या जागांकडे दुर्लक्ष होतंय,’ असं म्हणत त्यांनी चित्रपटातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टमधील पाच मोठे मुद्दे पाहुयात..

    1. चित्रपटातला संदेश अतिशय महत्वाचा आहे आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करुच शकत नाही. उत्तरार्धात तो काहीसा ढोबळ पद्धतीने आपल्यासमोर ठेवला जातो, एकदा तर अक्षरश: लिहूनही दाखवला जातो, पण त्यामुळे त्या संदेशाचं महत्व कमी होत नाही. समाजातल्या सर्व स्तरांना समान संधी हवी, आपणच उभारलेल्या भिंती आपल्याच बांधवांना जगण्याच्या हक्कापासून दूर ठेवतायत हे एक महत्वाचं सत्य तर आहेच, वर चित्रपटाचं महत्वाचं अंग असलेल्या क्रीडाक्षेत्राबद्दलही ‘आपण जर भूमिका बदलली तर आपल्या कामगिरीत किती मोठा बदल संभवू शकेल’ याबद्दलचं विवेचन त्यात आहे. केवळ हे एक कारणही हा चित्रपट बनवला जाण्यासाठी आणि लोकांनी तो पाहण्यासाठी पुरेसं आहे.
    2. तो पहावा याचं दुसरं कारण म्हणजे कास्ट. अमिताभ बच्चनच नाही, तर प्रामुख्याने इतर. अमिताभ बच्चनसाठी ही भूमिका अवघड नाही, आणि या प्रकारच्या मोठ्या स्टारचा समावेश चित्रपट अधिक प्रेक्षकांना ॲक्सेसिबल करण्यासाठी केला गेला आहे यातही शंका नाही. त्याशिवाय अनेक दिग्दर्शकांप्रमाणे नागराजलाही बच्चनसाहेबांना दिग्दर्शित करण्याची इच्छा निश्चितच असेल. कदाचित तिथेही नट अनोळखी असता तर आपण कदाचित त्या भूमिकेने ( आणि ती ज्या व्यक्तीवर आधारीत आहे त्या विजय बारसे यांच्या कामानेही ) अधिक प्रभावित झालो असतो असं माझं मत आहे, पण व्यावसायिक निर्णय जर गुणवत्ता असलेल्या चित्रपटाला पुढे नेऊ शकणार असतील, तर ते जरुर घ्यावेत. पण ते सोडता झुंडच्या पूर्वार्धात येणाऱ्या आणि उत्तरार्धात टिकून असणाऱ्या भूमिकांमधले अनेक जण हे चित्रपटाला खूप खरा करतात. अंकुश गेडाम (डॅान) , एंजल ॲंथनी ( एंजल), प्रियांशू (बाबू) हे त्यातले काही. पण या टीममधले बरेच जण आपल्या लक्षात रहातात. आकाश ठोसर, रिंकू राजगुरु वगैरे नागराजला नक्कीच जवळचे आहेत आणि बहुधा ‘आपला’ चित्रपट म्हणूनच यात सहभागी झाले असावेत. पण त्यांना इथे टाळायला हवं होतं असं मला वाटतं. त्यांच्या भूमिका लहान आहेत आणि त्या पुरेशा खोलात, वेळ घेऊन चित्रीत होत नसल्याने, त्यांना घेऊन काही साध्य होत नाही.
    3. आंबेडकर जयंतीचं गाणं, आणि त्यातलं बच्चन आणि आंबेडकर एका फ्रेममधे येणं, हे चित्रपटाच्या इतिहासासाठी महत्वाचं असलं तरी या विशिष्ट चित्रपटातल्या कथेच्या दृष्टीने ‘एक सणाचं गाणं’, एवढंच त्याचं महत्व आहे. त्या पलीकडे जात कथानकातही त्याला मोठं स्थान असतं (उदा फॅन्ड्रीतली मिरवणूक ), तर मला ते अधिक आवडलं असतं. एकूण गाणीही टायटल ट्रॅक वगळता सामान्यच आहेत.
    4. आणखी एक गोष्ट म्हणजे शेवट. फॅन्ड्री आणि सैराट, या दोन्हीचे शेवट अनपेक्षित आणि आयकॅानिक आहेत. त्यामानाने इथला शेवट ओळखीचा आणि स्वतंत्र इम्पॅक्ट असणारा नाही. याला एक कारण म्हणजे उत्तरार्ध टिपीकल स्पोर्ट्स फिल्मच्या वळणाने न जाताही शेवटी फिल्म नेहमीच्या सकारात्मक पडावावर पोचते. इथे शेवटावर येणारा मुद्दा संयत आणि प्रतिकात्मक आहे, मेटल डिटेक्टरने सूचित होणारा. तो अतिशय महत्वाचा आणि समजायलाही सोपा आहे यात शंका नाही, आणि शंभरात नव्वदांच्या तो लक्षात आल्यावाचूनही रहायचा नाही. पण तो शेवट अंगावर येणाराही नाही, आणि भावनिक इम्पॅक्ट असलेलाही नाही. तो वैचारीक शेवट आहे. आधीच्या चित्रपटांसारखा तो थक्क करत नाही. आता इथे असंही कोणी म्हणेल की सारखं थक्क कशाला करायला हवं? विचार आहे तो तुम्हाला पुरे नाही का? नागराजला असच दाखवायचय. तर फेअर इनफ. तुलना कदाचित योग्यही होणार नाही. पण ड्रॅमॅटीक शेवटाने मुद्दा झटक्यात पोचतो हा त्याच्या आधीच्या दोन चित्रपटांचा अनुभवच सांगेल. इथे तो अधोरेखित होण्यासाठी पुढे भिंतीवर लावलेली पाटी दिसावी लागते.
    5. असं सारं असूनही, शेवटाच्या थोडं आधी येणारा बच्चनसाहेबांचा मोनोलॅाग हा महत्वाचा आहे. खरं तर तो मांडत असलेल्या गोष्टी काही नव्या नाहीत. त्या प्रसंगापर्यंत पोचेस्तवर येणाऱ्या घटनांमधून आपल्याला त्या जाणवलेल्याच आहेत. पण तरीही हे भाषण त्या अधिक स्पष्ट करतं. आपल्यातलं कोणी त्या जाणवूनही ‘सिनेमा’ म्हणून त्या सोडून देणार असेल, तर त्या किती वास्तव आहेत हे आपल्यासमोर उघड करतं. आपल्याला भवतालाकडे जाणीवपूर्वक पहाण्यासाठी उद्युक्त करतं. आपण स्वत:ला कितीही सज्जन मानत असलो, तरी समाजातल्या एका मोठ्या वर्गाकडे पाठ फिरवून आपण आपल्याच कोषात सुखेनैव रहातोय का, हा विचार टोचणारा आहे. तो विचार आपल्याला हा चित्रपट करायला लावतो. आणि त्या दृष्टीने त्याचं यश निर्विवाद आहे.

हेही वाचा: 

Jhund: ‘झुंड’ने बॉक्स ऑफिसच्या कमाईची अपेक्षा पूर्ण केली का? नागराज म्हणतात..

Jhund: ‘साध्या माणसाची गोष्ट क्रांतीकारक कशी असू शकते?’ ‘झुंड’वर नागराज मंजुळेंचं वेगळं मत

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.