Dhanashree-Yuzvendra Chahal: धनश्री-युजवेंद्र चहलमध्ये सर्वकाही आलबेल नाही? इंस्टाग्रामवरून हटवलं पतीचं आडनाव

तेव्हापासून धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल विभक्त होणार की काय, अशी चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. लग्नानंतर धनश्री तिच्या नावापुढे पती युजवेंद्रचं चहल हे आडनाव जोडलं होतं. मात्र आता तिच्या नावापुढे हे आडनाव पहायला मिळत नाही.

Dhanashree-Yuzvendra Chahal: धनश्री-युजवेंद्र चहलमध्ये सर्वकाही आलबेल नाही? इंस्टाग्रामवरून हटवलं पतीचं आडनाव
Dhanashree-Yuzvendra Chahal: धनश्री-युजवेंद्र चहलमध्ये सर्वकाही आलबेल नाही? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 4:16 PM

इंटरनेट सेन्सेशन आणि सुप्रसिद्ध कोरिओग्राफर, डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Varma) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. धनश्री ही भारतीय गोलंदाज (Cricketer) युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मात्र अचानक तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नावापुढील चहल हे आडनाव हटवलं आहे. तेव्हापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल विभक्त होणार की काय, अशी चर्चा चाहत्यांमध्ये होत आहे. लग्नानंतर धनश्री तिच्या नावापुढे पती युजवेंद्रचं चहल हे आडनाव जोडलं होतं. मात्र आता तिच्या नावापुढे हे आडनाव पहायला मिळत नाही.

धनश्रीने चहल हे आडनाव काढून टाकलं

धनश्री वर्माने तिच्या नावापुढील चहल आडनाव हटवून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिच्या इंस्टाग्रामवर पाहिल्यास तिने युजरनेममधून चहल हे आडनाव काढून टाकलं आहे. यापूर्वी तिचं इंस्टाग्राम युजरनेम धनश्री वर्मा चहल असं होतं. लग्नानंतर धनश्रीने चहल आडनाव जोडलं होतं. त्यामुळे या दोघांमध्ये सर्व काही आलबेल आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हे सुद्धा वाचा

युजवेंद्र चहलची पोस्ट

धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फक्त आडनाव काढून टाकलं आहे. मात्र युजवेंद्रसोबतचे फोटो इंस्टाग्रामवरून हटवलेले नाहीत. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी चहलने एक फोटो पोस्ट केला होता. एक नवीन आयुष्य सुरु होत आहे, असं त्यावर लिहिलं होतं. प्रत्यक्षात या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट एका ऑनलाइन डान्स क्लासदरम्यान झाली होती. चहलने नृत्य शिकण्यासाठी धनश्री वर्माच्या वर्गात प्रवेश घेतला होता. इथूनच दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आणि दोघांनी लग्न केलं.

धनश्री वर्मा एक प्रोफेशनल कोरिओग्राफर आणि डान्सरही आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत तिच्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते. धनश्री वर्माने युजवेंद्र चहलसोबत मिळून अनेक रील्स बनवल्या आहेत. ती पेशाने डॉक्टर आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्याही प्रचंड आहे. धनश्री प्रमाणे नवरा युजवेंद्र चहलही सोशल मीडियावर तितकाच सक्रीय आहे. तो सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.