8 वर्षांपासून पत्नीने संबंध ठेवू दिले नाही, खासदाराची अभिनेत्रीविरोधात याचिका; कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

घटस्फोट प्रकरणात खासदार अनुभव मोहंती यांनी सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांचा उल्लेख केला होता.

8 वर्षांपासून पत्नीने संबंध ठेवू दिले नाही, खासदाराची अभिनेत्रीविरोधात याचिका; कोर्टाने दिले 'हे' आदेश
Anubhav Mohanty and Varsha PriyadarshiniImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 3:48 PM

ओडिया चित्रपट अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी (Varsha Priyadarshini) आणि अभिनेते-लोकसभा खासदार अनुभव मोहंती (Anubhav Mohanty) यांचा घटस्फोट (Divorce) सध्या चर्चेत आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान अनुभव मोहंती यांच्या याचिकेवर कटकच्या एडीजेएम न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने वर्षा प्रियदर्शिनी यांना अनुभव मोहंती यांचं वडिलोपार्जित निवासस्थान दोन महिन्यांत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अनुभव मोहंती यांनी वर्षाला दरमहा 30 हजार रुपये देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अनुभव यांनी वर्षाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. “मी तिच्यासाठी स्वतंत्र घराची व्यवस्था करण्यास तयार आहे. तिने माझं वडिलोपार्जित घर सोडावं,” असं त्यांनी एका याचिकेत म्हटलं होतं. याशिवाय दुसऱ्या याचिकेत त्यांनी वर्षा यांच्या उत्पन्नाचे स्रोत उघड करण्याची मागणीही केली होती. गेल्या आठवड्यात न्यायालयाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता.

घटस्फोट प्रकरणात खासदार अनुभव मोहंती यांनी सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते, “आमच्या लग्नाला आठ वर्षे झाली, पण इतकी वर्षे झाली तरी पत्नी वर्षा हिने संबंध ठेवण्यास परवानगी दिलेली नाही. मी मानसिक तणावातून जात आहे. अजून किती दिवस कोणी वाट पहावी, मला माझ्या पत्नीपासून घटस्फोट हवा आहे, पण प्रकरण आता कोर्टात आहे.”

हे सुद्धा वाचा

अनुभव मोहंती यांनी 2013 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2014 मध्ये त्यांनी वर्षा प्रियदर्शिनीशी लग्न केलं. मात्र लग्नाच्या काही दिवसांनी दोघांमध्ये मतभेद झाल्याची बातमी समोर आली. 2016 मध्ये पहिल्यांदा अनुभव मोहंती यांनी पत्नीविरोधात याचिका दाखल केली होती. आमच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत, पण पत्नी प्रियदर्शिनी शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं. यानंतर 2020 मध्ये ते पत्नीला घटस्फोट देण्यासाठी कोर्टात पोहोचले. घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर वर्षा यांनी मोहंती यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि इतर महिलांशी संबंध असल्याचा आरोपही केला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.