Fifty Shades: अभिनेत्रीने सांगितला सर्वांत बोल्ड चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव; “प्रत्यक्षात जे घडलं ते..”

'फिफ्टी शेड्स' या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित झाले होते आणि हॉलिवूडमधील सर्वांत बोल्ड चित्रपटांपैकी हे चित्रपट मानले जातात. या चित्रपटामुळे डकोटाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यात तिला बरेच न्यूड सीन्सही चित्रीत करावे लागले होते.

Fifty Shades: अभिनेत्रीने सांगितला सर्वांत बोल्ड चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव; प्रत्यक्षात जे घडलं ते..
Fifty Shades: अभिनेत्रीने सांगितला सर्वांत बोल्ड चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभवImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 4:09 PM

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री डकोटा जॉन्सनचा (Dakota Johnson) ‘पर्स्युएशन’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डकोटा ‘फिफ्टी शेड्स’ (Fifty Shades) चित्रपटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ‘फिफ्टी शेड्स’ या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित झाले होते आणि हॉलिवूडमधील सर्वांत बोल्ड चित्रपटांपैकी हे चित्रपट मानले जातात. या चित्रपटामुळे डकोटाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यात तिला बरेच न्यूड सीन्सही चित्रीत करावे लागले होते. शूटिंगचा तो सर्व अनुभव ‘सायकॉटिक’ (मानसिकदृष्ट्या वेड लावणारा) असल्याचा खुलासा डकोटाने या मुलाखतीत केला. चित्रपटाविषयी जसा विचार केला, तसं प्रत्यक्षात काहीच नव्हतं असं ती म्हणाली.

लेखिका एरिका लिओनार्ड (एल जेम्स या नावाने प्रसिद्ध) यांच्या पुस्तकावर ‘फिफ्टी शेड्स’च्या चित्रपटाची कथा आधारित होती. त्यामुळे चित्रपटाच्या क्रिएटिव्ह गोष्टींवर त्यांचं खूप नियंत्रण होतं आणि काही गोष्टी त्यांच्या मर्जीनेच व्हायच्या असं डकोटाने सांगितलं. “जरी दुसऱ्यांना ते फायदेशीर नाही वाटलं, तरी लेखिकेच्या आग्रहाखातर ते करावं लागत होतं. मी खूप वेगळ्या व्हर्जनच्या चित्रपटासाठी साईन केलं होतं, पण प्रत्यक्षात ते चित्रपट पूर्णपणे वेगळे बनवले गेले,” असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

व्हॅनिटी फेअरला दिलेल्या मुलाखतीत डकोटाने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा अनुभव सांगितला. “शूटिंगदरम्यान अनेक मतभेद होते. मी याबद्दल कधीच खरं बोलू शकली नाही, कारण तुम्हाला एखाद्या चित्रपटाची योग्य प्रकारे जाहिरात करायची असते आणि आम्ही शेवटी जे काही केलं त्याचा मला अभिमान आहे. सर्वकाही जसं अपेक्षित होतं तसं घडलं, पण ते अवघड होतं,” असं तिने पुढे सांगितलं.

पहा फोटो-

‘फिफ्टी शेड्स’च्या तिन्ही चित्रपटांमध्ये डकोटा आधी अभिनेता चार्ली हन्नमसोबत ॲनास्तेशिया स्टीलची भूमिका साकारणार होती. मात्र चित्रपटाच्या शेड्युलमुळे त्याने ऐनवेळी माघार घेतली. या घटनेनं लेखिका एल जेम्स इतकी नाराज झाली होती की तिने ख्रिश्चन ग्रेच्या भूमिकेसाठी अभिनेता जेमी डोर्ननला कास्ट करण्यापूर्वी चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट फाडून टाकली होती.

“लेखिका एरिकाला जसा चित्रपट बनवायचा होता, त्यानुसार आम्ही आधी सीन्स शूट करायचो आणि नंतर आमच्या इच्छेनुसार शूट करायचो. शूटिंगच्या आदल्या रात्री मी सीन्स पुन्हा लिहून काढायचे, जेणेकरून मी मधे मधे जुने संवाद जोडू शकेन. प्रत्येक वेळी हा मोठा गोंधळ आमच्या समोर निर्माण व्हायचा. जर मला त्यावेळी माहित असतं की हे सगळं असं होणार आहे, तर मला वाटत नाही की कोणीच हा चित्रपट केला असता. हे संपूर्ण प्रचंड मानसिक ताण देणारं होतं. पण आता मला त्या गोष्टींचा पश्चात्ताप नाही”, अशी प्रतिक्रिया डकोटाने दिली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.