Diljit Dosanjh: “त्याला नरसंहारच म्हटलं पाहिजे”; हृदयद्रावक घटनेबाबत दिलजीत दोसांज व्यक्त

31 ऑक्टोबर 1984 रोजी जेव्हा देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्याच शीख बॉडीगार्डने केली, तेव्हापासून देशात या दंगली सुरू झाल्या. त्यावेळी देशभरात असंख्य शीखांची हत्या झाली होती.

Diljit Dosanjh: त्याला नरसंहारच म्हटलं पाहिजे; हृदयद्रावक घटनेबाबत दिलजीत दोसांज व्यक्त
गायक आणि अभिनेता दिलजित दोसांजImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 2:19 PM

1984 मध्ये जी शीख दंगल झाली, त्याला खरंतर नरसंहार (genocide) म्हटलं पाहिजे असं वक्तव्य प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजने (Diljit Dosanjh) केलं आहे. दिलजीत सध्या त्याच्या आगामी ‘जोगी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीवर आधारित आहे. दिलजीतचा जन्म त्याच वर्षी जानेवारी महिन्यात झाला होता. त्या दंगलींबद्दल (Riots) ऐकूनच मी लहानाचा मोठा झालो असं तो म्हणाला.

31 ऑक्टोबर 1984 रोजी जेव्हा देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्याच शीख बॉडीगार्डने केली, तेव्हापासून देशात या दंगली सुरू झाल्या. त्यावेळी देशभरात असंख्य शीखांची हत्या झाली होती. देशातील अनेक भागांमध्ये त्यावेळी दंगली घडल्या होत्या. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘जोगी’ या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख समुदायाविरोधात उठलेल्या हिंसेची कथा मांडण्यात आली आहे.

त्यावेळी सर्वाधिक हिंसाचाराच्या घटना या दिल्लीत घडल्या होत्या. स्वत:च्या घरातही शीख त्यावेळी सुरक्षित नव्हते. याविषयी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत दिलजीत म्हणाला, “त्या घटनेला आपण दंगल म्हणू नये. किंबहुना त्या घटनेसाठी सर्वांत योग्य शब्द म्हणजे नरसंहार. जेव्हा दोन्ही बाजूंनी लढाई केली जाते, तेव्हा त्याला आपण दंगल म्हणू शकतो. माझ्या मते त्या घटनेला नरसंहार म्हटलं पाहिजे. असं नाही की ती घटना फक्त एक-दोन किंवा काही लोकांसोबत घडली होती. ती घटना सामूहिकरित्या आम्हा सर्वांसोबत घडली होती.”

हे सुद्धा वाचा

“मी जन्माला आल्यापासून याच घटनांविषयी ऐकतोय. आजही मी त्याच आठवणींसोबत जगत आहे. ही कोणतीच नवी कथा नाही. जी गोष्ट ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो, तीच गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. त्यातून आम्ही सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे”, असं तो पुढे म्हणाला.

दिलजीत दोसांजची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या शुक्रवारी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तीन मित्रांचा भावनिक आणि थ्रिलिंग प्रवास दाखवण्यात येणार आहे. दिलजीतशिवाय यामध्ये मोहम्मद जीशान आयुब आणि हितेन तेजवानी मुख्य भूमिकेत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.