Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात ईडीने ठरवलं आरोपी

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचं नाव आरोपी म्हणून लिहिण्यात आलं आहे.

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात ईडीने ठरवलं आरोपी
Jacqueline FernandezImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 12:14 PM

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचं नाव आरोपी म्हणून लिहिण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश हा गुन्हेगार असल्याची जॅकलिनला आधीच माहिती होती, असा दावा ईडीने केला आहे. सुकेश हा खंडणीखोर (extortionist) आहे हेही तिला माहीत होतं. यामुळेच ईडीने जॅकलिनवर ताशेरे ओढले आहेत. जॅकलिनला याप्रकरणी अद्याप अटक झालेली नाही. कारण आतापर्यंत न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली नसली तरी तिला देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

प्रकरण काय आहे?

सुकेश चंद्रशेखरवर 215 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासात सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई करत त्याची सात कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे. सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणी हिने सुकेशला जॅकलीनला भेटायला लावल्याचंही आरोपपत्रात उघड झालं आहे. सुकेशने पिंकी इराणीच्या मदतीने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली होती.

जॅकलिनवर आरोप

ईडी चार्टशीटमध्ये असंही उघड केलं की सुकेशने डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान जॅकलीन फर्नांडिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने कॉलला प्रतिसाद दिला नाही. जॅकलिनने आरोप केला होता की सरकारी कार्यालयातील कोणीतरी तिच्याशी संपर्क साधला आणि तिला शेखर रत्नवेला म्हणून ओळखत असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संपर्क साधण्यास सांगितलं होतं.

हे सुद्धा वाचा

सुकेशने दाखवली चुकीची ओळख

जॅकलिनने पुढे खुलासा केला होता की, जेव्हा तिने सुकेशशी संपर्क साधला तेव्हा त्याने स्वतःची ओळख सन टीव्हीचा मालक असल्याचं सांगितलं होतं. आपण जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील असून त्या चेन्नई इथल्या असल्याचंही त्याने सांगितलं. जॅकलिन म्हणाली, सुकेश म्हणाला होता की तो माझा खूप मोठा चाहता आहे. सन टीव्हीचे अनेक प्रोजेक्ट्स त्याच्याकडे असून मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करावं, अशी अपेक्षा त्याने जॅकलिनकडे व्यक्त केली. तेव्हापासून दोघेही संपर्कात आले होते.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....