Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kaali Poster Row: ‘काली’ पोस्टरवरून वाद; वाढता विरोध पाहता ट्विटरने हटवली लीना मणिमेकलाई यांची पोस्ट

या पोस्टरवरील वादावरून लीना यांच्याविरोधात एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आली आहे. लीना यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मुंबईत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

Kaali Poster Row: 'काली' पोस्टरवरून वाद; वाढता विरोध पाहता ट्विटरने हटवली लीना मणिमेकलाई यांची पोस्ट
लीना मणिमेकलाई Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 1:23 PM

डॉक्युमेंट्री फिल्म ‘काली’च्या पोस्टरवरून (Kaali Poster) सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर ट्विटरने चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांची पोस्ट हटवली आहे. या ट्विटमध्ये (Twitter) लीना यांनी त्यांच्या ‘काली’ या डॉक्युमेंट्रीचा पोस्टर शेअर केला होता. त्याच पोस्टरला जोरदार विरोध केला जात आहे. पोस्टरमध्ये हिंदू देवी कालीच्या वेशातील एका अभिनेत्रीने हातात सिगारेट आणि LGBTQ चा ध्वज घेतला आहे. या पोस्टवरून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. इतकंच नव्हे तर लीना यांच्यावर कारवाई व्हावी अशीही मागणी होत आहे.

या पोस्टरवरील वादावरून लीना यांच्याविरोधात एफआयआरसुद्धा दाखल करण्यात आली आहे. लीना यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत दिल्ली, उत्तरप्रदेश आणि मुंबईत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कॅनडा चित्रपट महोत्सवात (रिदम्स ऑफ कॅनडा) ही डॉक्युमेंट्री लाँच करण्यात आली होती. तर कॅनडामध्ये आयोजित केलेल्या एका प्रोजेक्ट अंतर्गत ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित करण्यात आली होती. कॅनडामध्ये भारतीय उच्चायुक्तालयाने याप्रकरणी आक्षेप व्यक्त करत कंटेटला हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर ज्या म्युझियममध्ये ही डॉक्युमेंट्री दाखवली गेली, त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी मागितली आहे.

लीना यांचं ट्विट-

हे सुद्धा वाचा

कोण आहे लीना मणिमेकलाई?

लीना मणिमेकलाई ही मदुराईमधील सुदूर गावातील महाराजापुरम इथली राहणारी आहे. तिचे वडील कॉलेजमध्ये लेक्चरर होते. लीना एका शेतकरी कुटुंबातील असून तिच्या गावातील प्रथेनुसार तिथल्या मुलीचं लग्न तिच्या मामाशी केलं जातं. लीनाला जेव्हा समजलं की तिचे कुटुंबीय तिच्या लग्नाची तयारी करत आहेत, तेव्हा ती चैन्नईमधून पळून आली. त्यानंतर तिने इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. तिने आयटी सेक्टरमध्ये नोकरीसुद्धा केली. नोकरीनंतर तिने चित्रपटविश्वात काम करण्याचा निर्णय घेतला.

हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी पोस्टरविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. “लहानपणी आपण ज्याप्रकारे बाहुल्यांशी खेळायचो, तशाच प्रकारे आता काही लोक सनातन धर्माशी खेळत आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी कधी भगवान श्री राम यांना काल्पनिक म्हटलं जातं तर कधी भारत मातेचं नग्न चित्र बनवलं जातं. एवढंच नाही तर आता माँ कालीच्या हातात सिगारेट दाखवण्यासारखं महापाप घडलं आहे. चित्रपट निर्मात्यांनी केलेल्या उद्धटपणाला क्षमा करता येणार नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर कोणीही सांभाळू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण करू. मी लीना यांना विचारू इच्छितो की तुम्ही नेमकी इच्छा काय आहे? की तुमचंही शीर धडापासून वेगळं व्हावं?,” असं ते म्हणाले.

नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा.
'अंदर की बात है...', विरोधकांच्या घोषणाबाजीवर फडणवीसांचा मिश्कील टोला
'अंदर की बात है...', विरोधकांच्या घोषणाबाजीवर फडणवीसांचा मिश्कील टोला.
कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट
कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट.
नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड समोर, कोण आहे फहीम खान?
नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड समोर, कोण आहे फहीम खान?.
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.