‘यालाच मिक्स बिर्याणी म्हणतात’; हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलानच्या एकत्र फोटोवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

अभिनेता गर्लफ्रेंड सबा आझादसोबत (Saba Azad) हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि बॉयफ्रेंड अर्सलान गोणीसोबत (Arslan Goni) सुझान खान (Sussane Khan) या चौघांचा एकत्र फोटो पाहून सध्या नेटकऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

'यालाच मिक्स बिर्याणी म्हणतात'; हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलानच्या एकत्र फोटोवर नेटकऱ्यांचे कमेंट्स
Hrithik-Saba, Sussanne-ArslanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:56 PM

अभिनेता गर्लफ्रेंड सबा आझादसोबत (Saba Azad) हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि बॉयफ्रेंड अर्सलान गोणीसोबत (Arslan Goni) सुझान खान (Sussane Khan) या चौघांचा एकत्र फोटो पाहून सध्या नेटकऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. हृतिक आणि सुझानने जवळपास 13 वर्षांच्या संसारानंतर एकमेकांना घटस्फोट दिला. त्यानंतर सुझान अर्सलानला डेट करू लागली आणि नुकतंच हृतिकनेही अभिनेत्री सबासोबतचं त्याचं नातं ‘ऑफिशियल’ केलं आहे. मात्र या चौघांना एकत्र पाहून चाहते चक्रावले आहेत. या चौघांनी एकत्र येण्याचं निमित्त ठरलं ते म्हणजे गोव्यात सुझानच्या नव्या रेस्तराँचं उद्घाटन. गोव्यातील पंजिममध्ये सुझानने स्वत:चं रेस्तराँ सुरू केलं. या रेस्तराँच्या ग्रँड ओपनिंगसाठी तिचा पूर्वाश्रमीचा पती हृतिक याने गर्लफ्रेंड सबा आझादसोबत हजेरी लावली. एक दिवस आधीच हृतिक आणि सबा हातात हात घालून एअरपोर्टवर दिसले. त्यानंतर थोड्या वेळाने सुझान आणि अर्सलानसुद्धा सोबत एअरपोर्टवर झळकले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांवर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘ही तर मिक्स बिर्याणी’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर ‘हा फोटो पाहून मला चक्कर येतेय.. गर्लफ्रेंड पत्नी बॉयफ्रेंड’ असंही एकाने म्हटलं. ‘फक्त त्यांची दोन मुलंच या फोटोफ्रेममध्ये नाहीत’ अशीही कमेंट नेटकऱ्याने केली.

पहा चौघांचा फोटो-

फोटोवरील कमेंट्स

सुझान खान आणि हृतिक रोशन यांनी 2000 मध्ये लग्न केलं. या दोघांना रेहान आणि रिधान ही दोन मुलं आहेत. लग्नाच्या 14 वर्षांनंतर 2014 मध्ये या दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला. आता हृतिक सबाला डेट करत आहे, तर सुझान ही अभिनेता अर्सलान गोणीला डेट करतेय. अर्सलान हा बिग बॉस फेम अली गोणीचा भाऊ आहे.

हेही वाचा:

Hrithik Saba: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादविषयी या 10 गोष्टी माहित आहेत का?

Lock Upp: पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल मंदाना करीमीचा धक्कादायक खुलासा, “ओळखीतल्या प्रत्येकीशी त्याचे शरीरसंबंध..”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.