Johnny Depp: जॉनी डेपचा खटला जिंकल्यानंतर वकिलाचं नशिब पालटलं; रातोरात बनली इंटरनेट सेन्सेशन
ज्याप्रकारे तिने अँबरला थेट सवाल केले, जॉनीसोबत असलेलं तिचं मैत्रीपूर्ण नातं या सर्वांची चर्चा सोशल मीडियावर झाली. इतकंच नव्हे तर ती जॉनीला डेट करत आहे का, असाही प्रश्न अनेकांनी विचारला.
हॉलिवूड स्टार जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची पूर्वी पत्नी अँबर हर्ड (Amber Heard) यांचा खटला जगभरात गाजला. सहा आठवड्यांच्या सुनावणीदरम्यान सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे जॉनीच्या वकिलाची. ब्राऊन रुडनिक या लॉ फर्मची वकील कॅमिल वास्क्वेझने (Camille Vasquez) कोर्टात जॉनी डेपचं प्रतिनिधित्व केलं. ज्याप्रकारे तिने अँबरला थेट सवाल केले, जॉनीसोबत असलेलं तिचं मैत्रीपूर्ण नातं या सर्वांची चर्चा सोशल मीडियावर झाली. इतकंच नव्हे तर ती जॉनीला डेट करत आहे का, असाही प्रश्न अनेकांनी विचारला. आता अँबरविरोधातील जॉनीचा खटला जिंकल्यानंतर तिचं नशिबच पालटलंय असं म्हणायला हरकत नाही. कॅमिली आधी तिच्या कंपनीसाठी लिटिगेशन असोसिएट म्हणून काम करत होती. आता तिचं प्रमोशन करण्यात आलं आहे.
कॅमिलच्या प्रमोशनबद्दल सांगताना ब्राऊन रुडनिकचे अध्यक्ष आणि सीईओ विलियम बाल्डिगा म्हणाले, “आम्ही कॅमिलला कंपनीचा भागीदार बनवलं आहे. आम्ही या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ही घोषणा करणार होतो. परंतु जॉनी डेपच्या खटल्यादरम्यान कॅमिलने तिच्या दमदार कामगिरीने हे सिद्ध केलं की ती आता पुढील पाऊल उचलण्यास तयार आहे. आम्हाला तिचा खूप अभिमान आहे.”
पहा कोर्टातील व्हिडीओ-
View this post on Instagram
कॅमिल ही कॅलिफोर्नियास्थित वकील असून जॉनी डेपच्या खटल्यामुळे ती प्रकाशझोतात आली. तिच्या प्रश्नांमुळे आणि कोर्टातील तिच्या आत्मविश्वासामुळे सोशल मीडियावर ती अनेकांची चाहती झाली. कॅमिलला इंटरनेट सेन्सेशन वकील असंही नाव देण्यात आलं. मे महिन्यात कॅमिलला डेटिंगच्या चर्चांबद्दल प्रश्न विचारला गेला. मात्र यावर ती होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर न देता केवळ हसली.
जॉनी आणि कॅमिल वास्क्वेझ-
View this post on Instagram
जॉनी आणि अँबर हर्ड यांनी 2015 मध्ये लग्न केलं. मात्र मे 2016 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यावेळी अँबरने जॉनीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. जॉनीने तिचे आरोप फेटाळेल आणि ऑगस्ट 2016 मध्ये हे दोघं विभक्त झाले.