Johnny Depp: जॉनी डेपला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर वकील कॅमिलने सोडलं मौन; म्हणाली..

कॅमिल ही कॅलिफोर्नियास्थित वकील असून जॉनी डेपच्या खटल्यामुळे ती प्रकाशझोतात आली. तिच्या प्रश्नांमुळे आणि कोर्टातील तिच्या आत्मविश्वासामुळे सोशल मीडियावर ती अनेकांची चाहती झाली.

Johnny Depp: जॉनी डेपला डेट करण्याच्या चर्चांवर अखेर वकील कॅमिलने सोडलं मौन; म्हणाली..
Johnny Depp's lawyer Camille VasquezImage Credit source: REUTERS
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 5:11 PM

हॉलिवूड स्टार जॉनी डेपच्या (Johnny Depp) मानहानीच्या खटल्याची सुनावणी झाल्यापासून सोशल मीडियावर त्याच्या वकिलाची जोरदार चर्चा आहे. नुकताच जॉनीने त्याची पूर्व पत्नी अँबर हर्डविरोधातील (Amber Heard) मानहानीचा खटला जिंकला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आणि आता खटला जिंकल्यानंतरही जॉनी आणि त्याची वकील कॅमिल वास्क्वेझ (Camille Vasquez) यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं. जॉनीचा हा खटला टेलिव्हिजनवर लाइव्ह होता. त्यामुळे कोर्टात जे काही घडलं, ते सर्वसामान्यांनाही पहायला मिळालं. सोशल मीडियावर कोर्टातील अनेक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये जॉनी आणि कॅमिल यांची खास मैत्री पहायला मिळते. आता या चर्चांवर अखेर कॅमिलने मौन सोडलं आहे.

‘पीपल मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत कॅमिल म्हणाली, “एखाद्या महिलेनं तिचं काम उत्तम केल्यावर अशा चर्चा होतातच. पण हे खूप निराशाजनक आहे. जॉनी हा माझा खूप चांगला मित्र आहे आणि गेल्या साडेचार वर्षांपासून मी त्याच्यासाठी काम करतेय. त्याच्यासोबतची माझी वागणूक चुकीची आणि अनप्रोफेशनल होती असं काही माध्यमांमध्ये म्हटलं गेलं. मी स्वत: एका रिलेशनशिपमध्ये आहे आणि मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत खूप खूश आहे. एखाद्या वकिलाने त्याच्या क्लाएंटला डेट करणं हे चुकीचं आहे आणि एखाद्याने अशा अफवा पसरवणं हेसुद्धा चुकीचं आहे. हे एखाद्या स्त्रीचा दर्जा कमी केल्यासारखं आहे. कदाचित माझ्या कामामुळे मला अशा गोष्टींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे या चर्चा जेव्हा होऊ लागल्या तेव्हा मला फारसं आश्चर्य वाटलं नाही.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

खटल्यादरम्यान जॉनीशी झालेल्या जवळीकबद्दल ती पुढे म्हणाली, “जॉनी त्याच्या न्यायासाठी तिथे लढत होता. त्याच्याविरोधात तथ्यहीन आरोप होत असताना त्या व्यक्तीने दररोज कोर्टात येऊन बसलेलं पाहून मला प्रचंड दु:ख व्हायचं. अशा व्यक्तीची मी माझ्या परीने पूर्ण मदत केली आहे. कोर्टात त्याला थोडा आधार देण्याचा प्रयत्न मी केला. मग ते त्याचा हात माझ्या हातात घेऊन का होईना. आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ हे आश्वासन मी जॉनीला देण्याचा प्रयत्न केला.”

पहा व्हिडीओ-

कॅमिल ही कॅलिफोर्नियास्थित वकील असून जॉनी डेपच्या खटल्यामुळे ती प्रकाशझोतात आली. तिच्या प्रश्नांमुळे आणि कोर्टातील तिच्या आत्मविश्वासामुळे सोशल मीडियावर ती अनेकांची चाहती झाली. कॅमिलला इंटरनेट सेन्सेशन वकील असंही नाव देण्यात आलं. जॉनीचा खटला जिंकल्यानंतर तिचं प्रमोशनही करण्यात आलं. कॅमिली आधी तिच्या कंपनीसाठी लिटिगेशन असोसिएट म्हणून काम करत होती. आता ती त्या लॉ फर्ममध्ये पार्टनर म्हणून काम करतेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.